विराट कोहली आता भारतीय एकदिवसीय संघाचा कर्णधार नाही. टी-२० नंतर बीसीसीआयने एकदिवसीय संघाचे कर्णधारपदही रोहित शर्माकडे दिले असून आता भारतीय कसोटी कर्णधार विराट कोहली बीसीसीआयच्या या निर्णयामुळे दु:खी असल्याचे दिसत आहे. या कारणास्तव, तो अद्याप मुंबईत असलेल्या भारतीय क्रिकेट संघात सामील झालेला नाही. दक्षिण आफ्रिका दौऱ्यापूर्वी टीम इंडियाला रविवारी मुंबईत एकत्र येण्यास सांगण्यात आले होते, पण विराट शिबिराच्या पहिल्या दिवशी संघात सामील झाला नाही.

दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर निवडलेले भारतीय खेळाडू मुंबईत पोहोचले आहेत. तरीही सर्वजण कोहलीची वाट पाहत आहेत. सोमवारपासून सर्वांना ३ दिवस क्वारंटाइन केले जाईल आणि त्यानंतर ते १६ डिसेंबरला जोहान्सबर्गला रवाना होतील. इनसाइडस्पोर्टच्या वृत्तानुसार, बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने सांगितले, ”विराटला स्पष्टपणे माहिती देण्यात आली होती, परंतु तो कॅम्पमध्ये सहभागी झालेला नाही. आम्ही आशा करतो, की तो आज सोमवारी सामील होईल.”

हेही वाचा – VIDEO : कुछ तो लोग कहेंगे..! ट्रोल करणाऱ्यांना हिटमॅनची चपराक; वाचा ‘बेफिकीर’ रोहितचं उत्तर!

वृत्तानुसार, निवड समिती आणि बीसीसीआयच्या काही अधिकाऱ्यांनी विराट कोहलीला फोन करण्याचा प्रयत्न केला, पण त्याने ना फोन उचलला ना परत कॉल केला. याआधी विराटचे बालपणीचे प्रशिक्षक राजकुमार शर्मा यांनी त्याचा फोन बंद असल्याचे सांगितले होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एकदिवसीय संघाचा कर्णधार झाल्याबद्दल विराटने सोशल मीडियाच्या माध्यमातून रोहितचे अभिनंदनही केले नाही. त्याने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर युवराज सिंगला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे, केएल राहुल, ऋषभ पंत आणि शार्दुल ठाकूर शिबिरात सामील झाले आहेत.