भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीने दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचा एक मोठा विक्रम मोडला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या वनडेत विराटने अर्धशतक ठोकले. विराट आता विदेशी मैदानावर वनडेमध्ये सर्वाधिक धावा करणारा भारतीय फलंदाज बनला आहे. त्याने या बाबतीत सचिनला मागे टाकले.

सचिनने विदेशी मैदानावर १४७ सामन्यांत ५०६५ धावा केल्या. सचिनने १२ शतके आणि २४ अर्धशतके होती. त्याची सरासरी ३६.२४ होती. सचिनची विदेशात खेळताना सर्वोच्च धावसंख्या नाबाद १६३ होती. कोहलीने तेंडुलकरपेक्षा ३९ वनडे कमी खेळले आहेत. विदेशात खेळलेल्या १०८ सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम आता त्याच्या नावावर आहे.

हेही वाचा – “कॅप्टन बनल्यानंतर सुरुवातीला विराटला खूप…”, कोहलीच्या प्रशिक्षकानं केला ‘मोठा’ खुलासा!

विराट कोहलीने माजी कर्णधार सौरव गांगुली आणि प्रशिक्षक राहुल द्रविड यांनाही मागे टाकले आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वनडेमध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत त्याने या दोन्ही दिग्गजांना मागे टाकले आहे. पार्ल येथे खेळताना विराटने ३ चौकारांसह ५१ धावा केल्या. तो पुन्हा एकदा शतक ठोकण्यात अपयशी ठरला. फिरकीपटू तबरेझ शम्सीने त्याला टेंबा बावुमाकरवी झेलबाद केले.

विदेशी भूमीवर सर्वाधिक धावा (ODI)

  • कुमार संगकारा – ५५१८ धावा
  • विराट कोहली – ५१०८ धावा
  • रिकी पाँटिंग – ५०९० धावा
  • सचिन तेंडुलकर – ५०६५ धावा

विदेशी भूमीवर भारतासाठी सर्वाधिक धावा (ODI)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
  • विराट कोहली – ५१०८ धावा
  • सचिन तेंडुलकर – ५०६५ धावा
  • महेंद्रसिंह धोनी – ४५२० धावा
  • राहुल द्रविड – ३९९८ धावा
  • सौरव गांगुली – ३४६८ धावा