भारतीय क्रिकेट संघातल्या बहुतचर्चित खेळाडूंच्या यादीत विराट कोहली अगदी सहजगत्या जाऊन बसला आहे. त्याची खेळण्याची कला, खेळपट्टीवर असणारे त्याचे वर्चस्व आणि त्याच्या वेगळ्याच अंदाजाने तो क्रिकेटविश्वात फार कमी काळातच प्रसिद्धी आणि यशाच्या शिखरावर पोहोचला आहे. विराटचा सहभाग असणाऱ्या जाहिराती आणि त्याच्या सोशल नेटवर्किंग साइट्सवरच्या प्रत्येक पोस्टला लाखोंच्या घरात चाहते पसंत करतात. विराटचे बॉलिवूडशी असलेले नाते असो किंवा त्याचा दिलखुलास संवाद, विराट नेहमीच त्याच्या हटके अंदाजासाठी ओळखला जातो. आपल्या चाहत्यांना कधीही निराश न करणाऱ्या विराट कोहलीने नुकतेच त्याच्या इन्स्टाग्राम आणि ट्विटर अकाउंटवरुन त्याच्या बालपणीचा एक फोटो पोस्ट केला आहे.
पद्धतशीर डाएट आणि व्यायामांच्या या दिवसांत विराटने हा फोटो पोस्ट करत, एकेकाळी आपण पुढ्यात येईल त्या खाण्याच्या पदार्थावर ताव मारायचो असे म्हणणारा विराट या फोटोमध्ये बर्गर खाताना दिसतो आहे. तरुणींच्या मनावर विशेष भुरळ घालणाऱ्या विराटचा हा निरागस फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहे. वेस्ट इंडिज दौऱ्यावर भारतीय संघाची धुरा सांभाळणाऱ्या विराट कोहलीवर अनेकांच्या अपेक्षा आणि विश्वास टिकून आहे. अनेकदा टीकाकारंना त्याच्या खेळीनेच उत्तर देत गारद करणाऱ्या विराटच्या वेस्ट इंडिज दौऱ्यातील कामगिरीकडेच क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागून राहिले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Virat kohlis recent post is just overloaded with innocence
First published on: 21-07-2016 at 10:23 IST