’ कराची : भारताविरुद्ध ट्वेन्टी-२० विश्वचषकातील सामन्यात पाकिस्तानचा सलामीवीर मोहम्मद रिझवानने विश्रांतीच्या वेळेमध्ये मैदानात नमाजाचे पठण केले. त्याचे कौतुक करताना पाकिस्तानचा माजी कर्णधार वकार युनिसने वादग्रस्त विधान केले. ‘‘रिझवानने हिंदू लोकांमध्ये उभे राहून नमाजाचे पठण केले हे मला आवडले,’’ असे वकार म्हणाला. त्याच्यावर प्रख्यात समालोचक हर्षां भोगले, भारताचा माजी गोलंदाज वेंकटेश प्रसाद यांच्यासह अनेकांनी टीका केल्यावर त्याने सर्वाची माफी मागितली.
संग्रहित लेख, दिनांक 28th Oct 2021 रोजी प्रकाशित
वादग्रस्त विधानानंतर वकार युनिसची माफी
भारताचा माजी गोलंदाज वेंकटेश प्रसाद यांच्यासह अनेकांनी टीका केल्यावर त्याने सर्वाची माफी मागितली.
Written by लोकसत्ता टीम

First published on: 28-10-2021 at 02:28 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Waqar younis apologizes for his controversial statement zws