scorecardresearch

Premium

Asia Cup ‘Final’साठी वॉशिंग्टन सुंदरला कोलंबोमधून आले बोलावणे, ‘या’ दुखापतग्रस्त खेळाडूचा बॅकअप म्हणून होणार सामील

Asia Cup 2023 Final: आशिया चषक स्पर्धेचा अंतिम सामना रविवारी होणार आहे. मात्र या जेतेपदाच्या सामन्यासाठी भारतीय प्लेइंग इलेव्हनमध्ये मोठा बदल पाहायला मिळू शकतो. हा सामना कोलंबोमध्ये खेळवला जाणार आहे.

washington sundar called up by team india
आशिया कप फायनलसाठी वॉशिंग्टन सुंदरला कोलंबोला बोलावण्यात आले आहे. तो टीम इंडियामध्ये सामील होऊ शकतो. (फोटो सौजम्या- एपी/एएनआय)

Washington Sundar Axar Patel Backup for Asia Cup 2023: आशिया चषक २०२३ स्पर्धेच्या फायनलपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का बसल्याचे दिसत आहे. वास्तविक, बांगलादेशविरुद्धच्या सुपर फोरच्या शेवटच्या सामन्यात ४२ धावांची उत्कृष्ट खेळी करणारा अक्षर पटेल दुखापतग्रस्त झाला आहे. बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात फलंदाजी करताना अक्षरला दुखापत झाली होती, मात्र आता अक्षर अंतिम सामन्यासाठी संघासोबत नसल्याची माहिती समोर येत आहे. त्याच्या जागी वॉशिंग्टन सुंदरला कोलंबोला बोलावण्यात आले आहे.

वॉशिंग्टनला सुंदरला आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी जायचे आहे –

क्रिकबझच्या वृत्तानुसार, २३ वर्षीय वॉशिंग्टन सुंदर रविवारी श्रीलंकेविरुद्धच्या अंतिम सामन्यासाठी टीम इंडियामध्ये सामील होऊ शकतो. अक्षर पटेलचा बदली खेळाडू म्हणून सुंदरला कोलंबोला बोलावण्यात आले आहे. वॉशिंग्टन सुंदर हा आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी टीम इंडियाचा एक भाग आहे. त्यामुळे सध्या तो बंगळुरूमधील एनसीएमध्ये सराव करत आहे. आशिया कप फायनलनंतर सुंदर पुन्हा बंगळुरूला पोहोचेल. चीनमध्ये २३ सप्टेंबरपासून आशियाई क्रीडा स्पर्धेला सुरूवात होणार आहे. मात्र, वॉशिंग्टन सुंदर श्रीलंकेविरुद्धच्या भारतीय प्लेइंग इलेव्हनचा भाग बनतो की नाही हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.

ICC ODI World Cup 2023 Updates
World Cup 2023: विश्वचषक स्पर्धेला फक्त एक दिवस बाकी, जाणून घ्या कधी आणि कुठे पाहता येणार सामन्यांचे लाइव्ह स्ट्रिमिंग?
IND vs AUS: Irfan Pathan's statement said If I were Sanju Samson I would be very disappointed
Sanju Samson: सॅमसनला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतून वगळल्याने इरफान पठाण नाराज; म्हणाला, “मी त्याच्या जागी असतो तर…”
india vs chaina football match
भारतासमोर चीनचे आव्हान; आशियाई क्रीडा स्पर्धेतील फुटबॉल सामन्यांना आजपासून सुरुवात
kapil dev
भारतीय संघ विश्वचषक जिंकण्यासाठी सज्ज -कपिल देव

अक्षर पटेला विश्वचषक स्पर्धेलाही मुकावे लागू शकते –

अक्षर पटेल हा देखील विश्वचषक संघाचा एक भाग आहे. सध्या त्याच्या दुखापतीबद्दल फारशी माहिती नाही, पण दुखापत गंभीर असेल तर त्याला विश्वचषकाला मुकावे लागू शकते आणि अशा स्थितीत वॉशिंग्टन सुंदर विश्वचषक संघाचा भाग बनू शकतो. अक्षरच्या जागी वॉशिंग्टन सुंदरचा संघात समावेश केला जाऊ शकते. कारण तो ऑफब्रेक गोलंदाजीसोबतच डावखुरा फलंदाज आहे. वॉशिंग्टनने या वर्षी जानेवारीत न्यूझीलंडविरुद्ध शेवटचा वनडे खेळला होता.

हेही वाचा – SA vs AUS: हेनरिक क्लासेनच्या वादळी शतकाच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने रचला इतिहास, ठरला जगातील पहिलाच संघ

आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखालील भारतीय क्रिकेट संघातील खेळाडूंची नावे जाहीर करण्यात आली आहेत. वॉशिंग्टन सुंदर हा या भारतीय संघाचा एक भाग आहे. आशिया कप फायनलनंतर वॉशिंग्टन सुंदर थेट आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी रवाना होईल, असे मानले जात आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व क्रीडा, वर्ल्डकप २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Washington sundar was called up by team india as akshar patels backup for the asia cup final 2023 vbm

First published on: 16-09-2023 at 13:50 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×