आशिया चषक स्पर्धा भारताने जिंकली. या स्पर्धेत बांगलादेशला अंतिम सामन्यात भारताने ३ गडी राखून पराभूत केले. या स्पर्धेतच भारताने पाकिस्तानला तब्बल दोन वेळा पराभूत केले. केवळ पाच दिवसांच्या फरकाने हे दोन सामने झाले. पहिल्या सामन्यात भारत ८ गडी राखून तर दुसऱ्या सामन्यात ९ गडी राखून जिंकला. त्यांनंतर पाकिस्तानच्या कामगिरीवर टीका झाली. मात्र माजी कर्णधार वसीम अक्रम पाकिस्तानच्या बाजूने धावून आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारताविरुद्ध झालेल्या सामन्यांमध्ये पाकिस्तानला मानहानीकारक पराभवाला सामोरे जावे लागले दोनही सामने एकतर्फी झाल्यामुळे पाकिस्तानच्या संघावर प्रचंड टीका करण्यात आली. पण आता विश्वचषक स्पर्धेला ८ महिन्याचा कालावधी शिल्लक आहे. त्यामुळे आता पाकिस्तानच्या संघाला आपली कामगिरी सुधारण्यासाठी फारसा कालावधी उरलेला नाही. पण पाकिस्तानचा संघ नक्कीच कमबॅक करेल, असे मत त्याने व्यक्त केले.

भारताने सर्वोत्तम खेळ केला. त्यांना चांगली संधी मिळाली आणि त्याचे त्याने सोने केले. त्यांना आर्थिक सहकार्य मिळत आहे. तसेच आयपीएल सारख्या स्पर्धांमधून त्याचे नवे खेळाडू तयार होत आहेत. त्याच वेळी पाकिस्तानचा खेळ मात्र अत्यंत सुमार राहिला. पाकिस्तानला भारताविरुद्धच्या सामन्यात आपला ठसा उमटवता आला नाही, असे अक्रमने नमूद केले.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Wasim akram confident that pakistan will bounce back
First published on: 01-10-2018 at 18:53 IST