टी-२० क्रिकेटचा नंबर वन फलंदाज सूर्यकुमार यादव सलग दुसऱ्या वनडेत गोल्डन डकचा बळी ठरला. त्याला मिचेल स्टार्कने भोपळाही न फोडता एलबीडब्ल्यू आऊट केले. तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील ही दुसरी वेळ आहे जेव्हा सूर्य खाते न उघडता बाद झाला. त्यामुळे आता सोशल मीडियाच्याच्या माध्यमातून चाहते संजू सॅमसनला संधी देण्याची मागणी करत आहेत. अशात माजी खेळाडू वसीम जाफरने दोन्ही खेळाडूंबद्दल प्रतिक्रिया दिली आहे.

विशाखापट्टणममध्ये मिचेल स्टार्कला आपली विकेट देऊन स्काय पॅव्हेलियनमध्ये परतला. तेव्हा सोशल मीडियावर संजू सॅमसनचे नाव ट्रेंड करू लागले. या मालिकेत सॅमसन भारतीय संघाचा भाग नाही, पण त्याला जेव्हा-जेव्हा संधी मिळाली तेव्हा त्याने कामगिरी केली आहे. अशा परिस्थितीत आगामी विश्वचषक पाहता त्याला संधी दिली जाऊ शकते. सूर्यकुमार यादवच्या जागी संजू सॅमसन हा चौथ्या क्रमांकावर चांगला पर्याय असू शकतो का, असा प्रश्न भारताचा माजी सलामीवीर वसीम जाफरला विचारला असता, त्याने याला वाईट विचार म्हटले नाही.

हेही वाचा – IPL 2023: नाव न घेता गौतमचे राहुलच्या टीकाकारांना चोख प्रत्युत्तर; म्हणाला, “त्यांना फक्त…”

ईएसपीएनक्रिकइन्फोशी बोलताना वसीम जाफर म्हणाला, “मला वाटते संजू सॅमसनला संधी देणे ही वाईट कल्पना नाही. त्याला जेव्हा-जेव्हा संधी मिळाली आहे, तेव्हा तो चांगला खेळला आहे. तो खूप चांगला खेळाडू आहे.” पण याशिवाय त्यानी सूर्यकुमार यादवबद्दल सहानुभूतीही व्यक्त केली. जाफर म्हणाला की कोणत्याही फलंदाजाला पहिला इन-स्विंग बॉल १४५ किमी प्रतितास वेगाने खेळणे कठीण असते. परंतु त्याच वेळी त्याने सूर्याला सांगितले की त्याने त्यासाठी तयार असायला हवे होते.

हेही वाचा – Virender Sehwag: ‘…म्हणून सचिनने मला लाइव्ह सामन्यात बॅटने मारले’, वीरेंद्र सेहवागने केला खुलासा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जाफर पुढे म्हणाला, “सूर्यकुमार यादवला कोणीही सहानुभूती देऊ शकते. कारण जेव्हा डाव्या हाताचा गोलंदाज पहिलाच चेंडूव १४५ किमी प्रतितास वेगाने टाकतो, तेव्हा एक समस्या उद्भवते, यात शंका नाही. पण मिचेल स्टार्क जेव्हा गोलंदाजी करतो, तेव्हा तो स्टंपवर हल्ला करू शकतो आणि चेंडू स्विंग करू शकतो, अशी त्याची अपेक्षा असावी. पहिलाच चेंडू जेव्हा अशा प्रकारचा येतो, तेव्हा थोडे अवघड असते. मात्र तिसऱ्या वनडेत भारतीय संघ त्याच्यासोबत जातो की नाही हे पाहावे लागेल.”