scorecardresearch

T20 WC 2024: ‘रोहित शर्मा नव्हे, तर विराट कोहली खेळणार पुढचा टी-२० विश्वचषक’; माजी खेळाडूची भविष्यवाणी

Wasim Jaffer Statement: वसीम जाफर म्हणाला की त्याला वाटत नाही युवा खेळाडूंना विराट-रोहित शर्मासारख्या मार्गदर्शक शक्तीची गरज आहे. त्यांनी आयपीएलमध्ये इतके क्रिकेट खेळले आहे, की त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी कोणाचीही गरज नाही.

Wasim Jaffer's prediction about virat and rohit
विराट कोहली आणि रोहित शर्मा (फोटो- संग्रहित छायाचित्र इंडियन एक्सप्रेस)

टीम इंडियाने २०२४ मध्ये होणाऱ्या टी-२० विश्वचषकासाठी आतापासून संघबांधणी सुरु केली आहे. या टी-२० विश्वचषकात भारतीय संघाचे नेतृत्व हार्दिक पांड्या करणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. अशात माजी क्रिकेटपटू वसीम जाफरने या टी-२० विश्वचषकातील विराट आणि रोहितच्या सहभागाबाबत मोठी भविष्यवाणी केली आहे.

वसीम जाफरने कर्णधार रोहित शर्मा पुढील टी-२० विश्वचषक स्पर्धेत खेळणार नसल्याची मोठी भविष्यवाणी केली आहे. त्याचबरोबर विराट कोहली या आयसीसी स्पर्धेत शेवटच्या वेळी खेळताना दिसणार आहे, असे म्हटले. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताला गेल्या वर्षी टी-२० विश्वचषक २०२२ च्या उपांत्य फेरीपर्यंत मजल मारता आली होती. कोहलीने या स्पर्धेत चमकदार कामगिरी केली होती. पण भारताल इंग्लंडकडून १० गडी राखून पराभव पत्करावा लागल्याने, भारताचे विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न अधुरे राहिले.

वसीम जाफरने पाकिस्तानी माजी क्रिकेटर बासित अलीच्या यूट्यूब चॅनलवर सांगितले की, ”मोठ्या स्पर्धा पाहता विराट कोहली आणि रोहित शर्माला विश्रांती देण्यात आली होती. ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी सामने येत आहेत, त्यानंतर आयपीएल आहे. त्यानंतर एकदिवसीय विश्वचषक. भारत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीसाठी पात्र ठरू शकतो. भविष्याकडे पाहता हा खेळ (टी-२०) तरुणांसाठी आहे. व्यक्तिशः मला रोहित शर्मा पुढील टी-२० विश्वचषकात खेळताना दिसत नाही. विराट कोहली खेळू शकतो, पण रोहित शर्मा पुढचा हंगाम नक्कीच खेळणार नाही. तो आधीच ३६ (३५) वर्षांचा आहे.”

हेही वाचा – Sohail Khan: सोहेल खानने उमरान मलिकबाबत ओकली गरळ; म्हणाला, ‘त्याच्यासारखे गोलंदाज पाकिस्तानच्या प्रत्येक…’

आगामी विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर रोहित शर्मा आणि कोहलीला टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांपासून दूर ठेवणे निवडकर्त्यांचे प्राधान्य असेल, असेही वसीम जाफरने सांगितले. त्यामुळे मोठी स्पर्धा पाहता ते मानसिकदृष्ट्या ताजेतवाने आणि ऑस्ट्रेलिया मालिकेसाठी तयार असणे महत्त्वाचे आहे, असे जाफर म्हणाला.

हेही वाचा – WPL 2023 Schedule: ४ मार्चपासून रंगणार महिला आयपीएलचा थरार; पहिल्या सामन्यात ‘हे’ दोन संघ असणार आमनेसामने

भारतीय संघातील युवा प्रतिभांना मार्गदर्शन करण्यासाठी रोहित शर्मा आणि विराट कोहली यांची गरज आहे का, असे विचारले असता, वसीम जाफर म्हणाला, त्याची गरज नाही. वसीम जाफर पुढे म्हणाला, “मला वाटत नाही की त्यांना मार्गदर्शक शक्तीची गरज आहे. त्यांनी आयपीएलमध्ये इतके क्रिकेट खेळले आहे. त्यांना मध्यभागी मार्गदर्शन करण्यासाठी कोणाचीही गरज नाही.”

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 04-02-2023 at 12:56 IST
ताज्या बातम्या