आंद्रे फ्लेचरने केलेल्या ६२ धावांच्या जोरावर वेस्ट इंडिजने दुसऱ्या ट्वेन्टी-२० सामन्यात न्यूझीलंडचा ३९ धावांनी पराभव केला आणि दोन सामन्यांची मालिका १-१ अशी बरोबरीत सोडविली.
प्रथम फलंदाजी करताना विंडीजने २० षटकांत ६ बाद १६५ धावा केल्या. त्यामध्ये फ्लेचर (६२)व लिंडेल सिमोन्स (३६) यांनी फलंदाजीत चांगली चमक दाखविली. न्यूझीलंडकडून ट्रेन्ट बोल्टने २२ धावांत दोन बळी घेतले.
केन विल्यम्सन (३७), ब्रेन्डन मॅक्क्युलम (२१) व रॉस टेलर (२१) यांनी दमदार खेळ करूनही न्यूझीलंड संघाचा डाव १९.१ षटकांत १२६ धावांत कोसळला. विंडीज संघाकडून शेल्डॉन कॉटरेल (३/२८) व सुनील नरीन (२/१९) यांनी प्रभावी गोलंदाजी केली.
संग्रहित लेख, दिनांक 8th Jul 2014 रोजी प्रकाशित
न्यूझीलंडवर मात करीत विंडीजची मालिकेत बरोबरी
आंद्रे फ्लेचरने केलेल्या ६२ धावांच्या जोरावर वेस्ट इंडिजने दुसऱ्या ट्वेन्टी-२० सामन्यात न्यूझीलंडचा ३९ धावांनी पराभव केला आणि दोन सामन्यांची मालिका १-१ अशी बरोबरीत सोडविली.

First published on: 08-07-2014 at 12:43 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: West indies beat new zealand by 39 runs to level t20i series