वेस्ट इंडिज प्लेअर्स असोसिएशन आणि वेस्ट इंडिज क्रिकेट मंडळ यांच्याशी खेळाडूंनी सकारात्मक आणि खेळीमेळीच्या वातावरणात चर्चा झाली असून, लवकरच याबाबत तोडगा निघेल अशी चिन्हे दिसत आहेत. मंगळवारी सायंकाळी ही तात्कालिन बैठक आयोजित करण्यात आली होती.
‘‘आर्थिक वाद विकोपाला गेल्यामुळे वेस्ट इंडिज संघाने भारत दौरा अर्धवट सोडण्याचा निर्णय घेतला. याबाबत बैठकीत गांभीर्याने चर्चा झाली. अतिशय मैत्रीपूर्ण, खेळीमेळीच्या आणि सकारात्मक वातावरणात ही बैठक झाली,’’ असे वेस्ट इंडिज क्रिकेट मंडळाने प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
मंडळाचे अध्यक्ष डेव्ह कॅमेरून, संचालक डॉन वेहबी, ल्युक हॅमेल-सिमथ, वेस्ट इंडिज प्लेअर्स असोसिएशनचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी वॉव्हेल हाइंड्स, सचिव वेन लुइस आणि पॅट्रिक फॉरेस्ट ही मंडळी या बैठकीला हजर होती.
संग्रहित लेख, दिनांक 29th Oct 2014 रोजी प्रकाशित
सकारात्मक चर्चेनंतर वेस्ट इंडिज क्रिकेट आशावादी
वेस्ट इंडिज प्लेअर्स असोसिएशन आणि वेस्ट इंडिज क्रिकेट मंडळ यांच्याशी खेळाडूंनी सकारात्मक आणि खेळीमेळीच्या वातावरणात चर्चा झाली असून, लवकरच याबाबत तोडगा निघेल अशी चिन्हे दिसत आहेत.
First published on: 29-10-2014 at 12:01 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: West indies cricket optimistic after positive discussions with bcci