कसोटी सामन्याच्या एका दिवसात संपूर्ण भारतीय संघाला बाद करून पुन्हा फॉलऑनमध्ये सुद्धा संपूर्ण संघ बाद करण्याची क्षमता न्यूझीलंडच्या गोलंदाजांमध्ये असल्याचा विश्वास किवींचा कर्णधार ब्रेन्डन मॅक्क्युलमने व्यक्त केला आहे.
ब्रेन्डन म्हणतो की, भारताचे २० विकेट्स घेण्याची क्षमता ठेवणारे गोलंदाज आमच्याकडे आहेत. त्यामुळे आम्हाला कोणतीही चिंता नाही.
ब्रेन्डन मॅक्क्युलमने कर्णधारी खेळी करत भारताच्या गोलंदाजांचा समाचार घेत द्विशतक ठोकले. त्याने नाबाद २२४ धावांची खेळी साकारली आणि संघाच्या धावसंख्येला ५०३ पर्यंत नेऊन ठेवले. किवींच्या या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघ पुन्हा गडगडला दुसऱया दिवसा अखेर भारताची धावसंख्या १३० झाली असून चार भारतीय फलंदाज तंबूत परतले आहेत.