India Champions vs Pakistan Champions, WCL 2025: इंग्लंडमध्ये सुरू असलेली वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लेजेंड्स २०२५ स्पर्धा सध्या शेवटच्या टप्प्यात पोहोचली आहे. या स्पर्धेतील सेमीफायनलमध्ये प्रवेश करणारे ४ संघ ठरले आहेत. इंडिया चॅम्पियन्स संघाचा सामना पाकिस्तानसोबत होणार आहे. तर दक्षिण आफ्रिका चॅम्पियन्स संघ ऑस्ट्रेलिया चॅम्पियन्स संघासोबत भिडणार आहे. सेमीफायनलमध्ये जाणारे ४ संघ ठरल्यानंतर एकच प्रश्न उपस्थित होत आहे, तो म्हणजे भारतीय संघ पाकिस्तानसोबत खेळणार का?.
याआधी दोन्ही संघ साखळी फेरीतील सामना खेळण्यासाठी आमनेसामने येणार होते. मात्र, भारतीय खेळाडूंनी हा सामना खेळण्यास नकार दिला होता. त्यामुळे आयोजकांकडून हा सामना रद्द करण्यात आला होता. आता हे दोन्ही संघ सेमीफायनलमध्ये भिडणार आहेत. हा सामना रद्द करू चालणार नाही. समजा हा सामना देखील रद्द करण्यात आला, तर याचा कोणाला फायदा होईल आणि कोणता संघ अंतिम फेरीत जाईल? जाणून घ्या.
भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये तणावाची स्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानचा सामना करण्यास नकार दिला होता. आयोजकांनीही या निर्णयाचा सन्मान करत सामना रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर भारतीयांच्या भावना दुखावल्यामुळे भारतीय क्रिकेट चाहत्यांची माफी देखील मागितली होती. पण आता सेमीफायनलचा सामना रद्द करणं मुळीच सोपं नाही.
जर भारतीय संघाने या सामन्यातून माघार घेतली आणि सामना रद्द झाला, तर हे भारतीय संघाचे मोठे नुकसान असेल. कारण पाकिस्तानला थेट स्पर्धेतील अंतिम फेरीत प्रवेश मिळेल. कारण पाकिस्तानचा संघ या स्पर्धेतील गुणतालिकेत अव्वल स्थानी होता. मात्र, या सामन्याबाबत कुठलीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
या ४ संघांचा सेमीफायनलमध्ये प्रवेश
पाकिस्तानचा संघ या स्पर्धेतील साखळी फेरीतील सामन्यानंतर अव्वल स्थानी आहे. त्यामुळे भारतीय संघ चौथ्या स्थानी असलेल्या भारतीय संघाचा सामना करणार आहे. तर गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी असलेला दक्षिण आफ्रिकेचा संघ गुणतालिकेत तिसऱ्या स्थानी असलेल्या ऑस्ट्रेलियाविरूद्ध होणार आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यात होणारा सेमीफायनलचा सामना ३१ जुलै रोजी पार पडणार आहे. तर दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणारा सामना देखील ३१ जुलै रोजी रंगणार आहे.