भारत आणि श्रीलंका संघांत तीन सामन्यांची वनडे मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील दुसरा कोलकाता येथे खेळला गेला, ज्यामध्ये भारतीय संघाने केएल राहुलच्या नाबाद ६४ धावांच्या जोरावर जिंकला. तसेच भारतीय संघाने ४ विकेट्सने सामना जिंकून मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली. या विजयानंतर भारतीय संघाचा माजी खेळाडू गौतम गंभीरने महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे.

विराट कोहली पहिल्या सामन्यात चमकला होता. त्याने ८७ चेंडूत ११३ धावा करून ४५ वे वनडे शतक पूर्ण केले. कोहलीचे हे ७३ वे आंतरराष्ट्रीय शतक आणि एकदिवसीय क्रिकेटमधील सलग दुसरे शतक होते; यापूर्वी त्याने बांगलादेशविरुद्ध ११३ धावांची अशीच धावसंख्या नोंदवली होती. तरी देखील, भारताने बांगलादेशविरुद्धची मालिका २-१ ने गमावली होती. भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीरने कोहलीसोबत भारतीय संघाच्या सुरुवातीच्या काळात ड्रेसिंग रूम शेअर केली होती. त्याने भारतीय संघावर तिखट टिप्पणी केली आहे.

After Virat Kohli Fight why Gautam Gambhir fiercely argue With Umpire
विराट कोहलीचा वाद संपेपर्यंत गौतम गंभीर भडकला; श्रेयसने इशारा करताच पंचांशी भिडला, पण झालं काय? पाहा Video
Ashutosh Sharma's Reaction After Defeat
‘त्या प्रशिक्षकांना मी आवडत नसे, ते मला संघात घेत नसत. यामुळे मी नैराश्यात गेलो’, आशुतोष शर्माचा संघर्ष
Despite the efforts of PR Sreejesh the Indian hockey team lost
श्रीजेशच्या प्रयत्नांनंतरही भारतीय हॉकी संघाचा पराभव
IPL 2024 Royal Challenger Bengaluru vs Lucknow Super Giants Match Updates in Marathi
IPL 2024: मयंक यादवचा सामना करायला ऑस्ट्रेलियाचा दिग्गज उत्सुक

भारताचे माजी फलंदाज संजय मांजरेकर यांच्यासह तज्ञ पॅनेलने गुरुवारी दुसऱ्या एकदिवसीय सामन्यादरम्यान कोहलीच्या नुकत्याच झालेल्या मिड-मॅच शोबद्दल सांगितले, गंभीरने “वैयक्तिक प्रतिभा” ऐवजी सामूहिक कामगिरीवर लक्ष केंद्रित केले पाहिजे असा आग्रह धरला.

हेही वाचा – Shahnawaz Dahani Post: राहुल द्रविड महान का आहेत? पाकिस्तानी खेळाडूनं शेअर केला स्वानुभव

गंभीरन स्टार स्पोर्ट्सवर बोलताना म्हणाला, “भारताने बांगलादेशविरुद्धची शेवटची वनडे मालिका गमावली होती, हे आपण विसरू नये. त्याचा आम्हाला विसर पडला आहे. होय, वैयक्तिक प्रतिभा महत्त्वाची आहे, वैयक्तिक शतके महत्त्वाची आहेत, जेव्हा तुमच्या रेकॉर्डचा विचार केला जातो. तेव्हा तुम्ही ५० किंवा १०० धावा केल्या तरी खूप छान वाटते, पण बांगलादेशमध्ये जे घडले ते तुम्ही कधीही विसरू नये. कारण हा खूप मोठा बोध आहे.”

हेही वाचा – IND vs SL 2nd ODI: सामन्यादरम्यान स्क्रीनवर असे काय दिसले? ज्यामुळे राहुल द्रविडला हसू फुटले, पाहा VIDEO

गंभीर पुढे म्हणाला, “बांगलादेशमध्ये बांगलादेशकडून हरलेल्या भारताची संपूर्ण ताकद, मला वाटते की आपण या मालिकेवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी तेथून तयार राहिले पाहिजे. भूतकाळात जे घडले ते विसरता कामा नये.’