scorecardresearch

IND vs SL 2nd ODI: सामन्यादरम्यान स्क्रीनवर असे काय दिसले? ज्यामुळे राहुल द्रविडला हसू फुटले, पाहा VIDEO

Rahul Dravid Smile: ईडन गार्डन्स मैदानावर भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यादरम्यान राहुल द्रविडचे रेकॉर्ड टीव्ही स्क्रीनवर दाखवण्यात आले. हे पाहून राहुल द्रविडलाही हसू आवरता आले नाही.

IND vs SL 2nd ODI: सामन्यादरम्यान स्क्रीनवर असे काय दिसले? ज्यामुळे राहुल द्रविडला हसू फुटले, पाहा VIDEO
राहुल द्रविड (फोटो-ट्विटर)

राहुल द्रविडने बुधवारी (११ जानेवारी) आपला ५० वा वाढदिवस साजरा केला. त्याने आपला वाढदिवस कोलकात्यात भारतीय संघातील सदस्यांसोबत साजरा केला. गुरुवारी ईडन गार्डन्सच्या मैदानावर भारत आणि श्रीलंका संघात दुसरा एकदिवसीय सामना पार पडला. या सामन्यादरम्यान राहुल द्रविडचे रेकॉर्ड टीव्ही स्क्रीनवर दाखवण्यात आले, जे पाहून द्रविडला हसू आवरता आले नाही.

टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांची गणना जगातील महान खेळाडूंमध्ये केली जाते. ५० वर्षीय राहुल द्रविडने १६४ कसोटी आणि ३४० एकदिवसीय सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. तसेच २००५-०७ दरम्यान संघाचे नेतृत्व केले. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात द्रविड हा चौथा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. त्याचवेळी त्याने एकदिवसीय सामन्यात १० हजार धावांचा आकडा पार केला होता.

द्रविडची नोव्हेंबर २०२१ मध्ये भारतीय पुरुष संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. मुख्य प्रशिक्षक म्हणून राहुल द्रविड २०२२ च्या टी-२० विश्वचषक स्पर्धेपासून चौकशीच्या कक्षेत आहे. विशेष म्हणजे द्रविडच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघ टी-२० विश्वचषक २०२२ ची उपांत्य फेरी गाठण्यात यशस्वी ठरला होता, परंतु महत्त्वपूर्ण सामन्यात इंग्लंडकडून १० विकेट्सने पराभव स्वीकारावा लागला होता. त्या पराभवाबाबत या महिन्यात बीसीसीआयची आढावा बैठक झाली, त्यात राहुल द्रविडही सहभागी झाला होता.

टीम इंडियाचे असे दोनच फलंदाज –

टीम इंडियाचे असे दोनच फलंदाज आहेत, ज्यांनी कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांमध्ये १०,०००हून अधिक धावा केल्या आहेत. एक महान फलंदाज सचिन तेंडुलकर आणि दुसरा राहुल द्रविड. द्रविडने कसोटी क्रिकेटमध्ये ५२.३१च्या सरासरीने १३२८८धावा केल्या, ज्यात ३६ शतके आणि ६३ अर्धशतकांचा समावेश आहे.

हेही वाचा – Coaching Beyond: ‘या’ लोभात विराट धोनीसोबतचे नाते तोडायला निघाला होता, आर श्रीधरांचा धक्कादायक दावा

त्याचवेळी द्रविडच्या वनडेमध्ये ३९.१६च्या सरासरीने १०,८८९ धावा आहेत. द्रविडने एकदिवसीय सामन्यांमध्ये १२ शतके आणि ८१ अर्धशतके केली आहेत. क्षेत्ररक्षक म्हणून कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक झेल घेण्याचा विश्वविक्रम द्रविडच्या नावावर आहे. राहुल द्रविडने ३०१ कसोटी डावात २१० झेल घेतले.

हेही वाचा – AUS vs AFG: क्रिकेट ऑस्ट्रेलियाला राशिद खानने दिली धमकी; म्हणाला, ‘जर तुम्ही अफगाणिस्तानशी…’

दुसऱ्या वनडेत टीम इंडियाचा दणदणीत विजय –

दुसऱ्या एकदिवसीय सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर श्रीलंकेचा संघ ३९.५ षटकात २१५ धावांवर आटोपला. नुवानिडू फर्नांडोने ५० आणि कुसल मेंडिसने ३४ धावा केल्या. भारताकडून कुलदीप यादव आणि मोहम्मद सिराज यांनी प्रत्येकी ३ बळी घेतले. प्रत्युत्तरात भारताने ४० चेंडू बाकी असताना ६ विकेट्सवर २१९ धावा करून सामना जिंकला. केएल राहुलने नाबाद ६४ धावांची शानदार खेळी केली. त्याचवेळी हार्दिक पांड्याने ३६ आणि श्रेयस अय्यरने २८ धावांचे योगदान दिले.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 13-01-2023 at 10:17 IST

संबंधित बातम्या