Asia Cup 2025 PVR Prasanth Team India Manager: आशिया चषक २०२५ अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. येत्या ९ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या आशिया चषकासाठी भारतीय संघ ४ सप्टेंबरला युएईला रवाना होण्याची शक्यता आहे. दरम्यान भारताच्या ताफ्यात अजून एक नवा सदस्य सामील झाला आहे, जो माजी आमदाराचा लेक आणि सध्या पदावर असलेल्या आमदाराचा जावई आहे. ज्यांच नाव पीव्हीआर प्रशांत असं आहे, आशिया चषकासाठी बीसीसीआयने त्याच्यावर एक नवी जबाबदारी सोपवली आहे.

पीव्हीआर प्रशांतला आशिया चषकासाठी भारतीय संघाचे मॅनेजर बनवण्यात आले आहे. प्रशांतला एडमिनिस्ट्रेटिव अनुभव आहे, ज्याचा विचार करून बीसीसीआयने त्यांना आशिया चषकामध्ये मोठी जबाबदारी दिली आहे.

कोण आहे टीम इंडियाचा नवा मॅनेजर?

टीम इंडियाचे नवे मॅनेजर म्हणून नियुक्त झालेले पीव्हीआर प्रशांत हा एका आमदाराच्या कुटुंबातील आहेत. त्याचे वडीलही आमदार माजी आमदार होते आणि त्याचे सासरेही आमदार आहेत. त्यामुळे भारतीय संघाचा नवे मॅनेजर एका आमदाराचा जावई आहे.

पीव्हीआर प्रशांतचे वडील पुलपर्थी रमांजनेयुलू, ज्यांना अंजी बाबू म्हणून ओळखले जाते, ते २००९ ते २०१४ या कालावधीत आमदार होते. मार्च २०२४ मध्ये त्यांनी पवन कल्याणच्या जनसेना पक्षात प्रवेश केला. पीव्हीआर प्रशांतचे सासरे श्रीनिवास राव २०२४ मध्ये भिमली येथून आमदार झाले आहेत. ते आंध्र प्रदेशच्या तेलुगू देसम पक्षाचे नेते आहेत. ते आंध्र प्रदेशचे मानव संसाधन आणि विकास मंत्री देखील राहिले आहेत.

पीव्हीआर प्रशांत हा सुद्धा क्रिकेटपटू आहे आणि त्याला प्रशासकिय कामाचा अनुभव आहे. प्रशांत हा आंध्र प्रदेश क्रिकेट असोसिएशनचा माजी उपाध्यक्ष राहिला आहे. त्यानंतर त्याने ओल्ड वेस्ट गोदावरी संघाकडून जिल्हा पातळीवर क्रिकेट देखील खेळलं आहे.

आशिया चषकासाठी पी. व्ही. आर. प्रशांतची निवड संघ व्यवस्थापकाच्या भूमिकेसाठी झाली आहे. संघ व्यवस्थापक म्हणून तो आशिया चषकादरम्यान खेळाडूंच्या प्रत्येक लहान-मोठ्या गोष्टींची, गरजांची काळजी घेईल. जो बीसीसीआय आणि भारतीय संघ यांच्यातील दुवा म्हणून काम करतील.

आशिया चषकामध्ये भारतीय संघाची मोहिम १० सप्टेंबरपासून सुरू होत आहे. युएईविरुद्ध पहिला सामना खेळल्यानंतर, भारतीय संघ १४ सप्टेंबर रोजी दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानविरूद्ध खेळताना दिसणार आहे. भारत-पाकिस्तान सामन्यावर सर्वांच्या नजरा असतील.