scorecardresearch

Premium

IND vs BAN: पदार्पणाच्या सामन्यात रोहित-तिलकला आऊट करणारा कोण आहे २० वर्षीय तंजीम हसन? घ्या जाणून

Tanzim Hasan Debut Sakib: बांगलादेशच्या २० वर्षीय युला गोलंदाजाने पदार्पणाच्या सामन्यात सर्वांना खूप प्रभावित केले. त्याने पहिल्याच सामन्यात भारतीय कर्णधाराची विकेट मिळवली.

Who is Tanzim Hasan Sakib
तंजीम हसनचे शानदार पदार्पण (फोटो-लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

Who is Tanzim Hasan Shakib took the wickets of Rohit Sharma: आशिया कपच्या सुपर फेरीतील सामन्यात भारत आणि बांगलादेशचे संघ आमनेसामने आहेत. या सामन्यात बांगलादेशकडून वेगवान गोलंदाज तंजीम हसनने पदार्पण केले. पदार्पणाच्या सामन्यात तंजीम हसनने भारतीय कर्णधार रोहित शर्माला आऊट करुन पहिली विकेट घेतली. यानंतर त्याने भारताकडून पदार्पण करणाऱ्या तिलक वर्मालाही बाद करून टीम इंडियाला मोठा धक्का दिला. भारताविरुद्ध पदार्पण करणारा तंजीम हसन केवळ २० वर्षांचा आहे.

बांगलादेशने आशिया चषक सुपर फोरच्या शेवटच्या सामन्यात पाच बदल केले. त्यामुळे २० वर्षीय युवा गोलंदाज तंजीम हसनला संधी दिली. पदार्पणाच्या सामन्यात तनझीम हसनने नव्या चेंडूने कहर केला. बांगलादेशच्या डावातील पहिल्याच षटकातील दुसऱ्या चेंडूवर २० वर्षीय युवा गोलंदाज तंजीम हसनने भारतीय कर्णधार रोहित शर्माला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. रोहित शर्माला खातेही उघडता आले नाही. तिसऱ्या षटकातील चौथ्या चेंडूवर तंजीमने तिलक वर्माला आऊट केले. तंजीमच्या चेंडूवर तिलक वर्मा बोल्ड झाला.

Naveen Ul Haq Retirement: Surprising decision of Afghan player Naveen Ul Haq announced his retirement at the age of 24
Naveen Ul Haq Retirement: कोहलीला भिडणाऱ्या अफगाणी खेळाडूचा आश्चर्यकारक निर्णय, वयाच्या २४व्या वर्षी ‘नवीन’ने केली निवृत्तीची घोषणा
IND vs AUS: Irfan Pathan's statement said If I were Sanju Samson I would be very disappointed
Sanju Samson: सॅमसनला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतून वगळल्याने इरफान पठाण नाराज; म्हणाला, “मी त्याच्या जागी असतो तर…”
Asia Cup 2023 in IND vs BAN Match Updates
IND vs BAN: टीम इंडियाच्या खेळाडूंना पाणी घेऊन जाताना किंग कोहलीने अस काही केलं की… विराटचा हा VIDEO पाहून तुम्हाला ही येईल हसू
Asia Cup 2023 IND vs BAN Match Updates
IND vs BAN: रोहित शर्माला सचिन तेंडुलकरचा मोठा विक्रम मोडण्याची संधी, बांगलादेशविरुद्ध कराव्या लागणार फक्त ‘इतक्या’ धावा

कोण आहे तंजीम हसन साकीब?

तंजीम हसन हा बांगलादेशातील सिल्हेटचा आहे. २०२१ मध्ये त्याने पहिला प्रथम श्रेणी सामना खेळला. आत्तापर्यंत तंजीम हसनने १२ प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने ३.१८च्या इकॉनॉमी रेटने २२ विकेट्स घेतल्या आहेत. त्याने आपल्या प्रथम श्रेणी कारकिर्दीत एकदा पाच विकेट घेण्याचा पराक्रमही केला आहे. तंजीम हसनने वयाच्या अवघ्या १६ व्या वर्षी लिस्ट ए क्रिकेटमधील पहिला सामना खेळला होता. त्याच्या नावावर ३७ लिस्ट ए सामन्यात ५७ विकेट्स आहेत.

हेही वाचा – IND vs BAN: रोहित शर्माच्या नावावर झाली लाजिरवाण्या विक्रमाची नोंद, आशिया कपमध्ये ‘हा’ नकोसा कारनामा करणारा ठरला पहिला भारतीय

आशिया चषकात नशिबाने झाला प्रवेश –

तंजीमचा आशिया चषक स्पर्धेतील प्रवेश नशीबाचा विषय ठरला. खरं तर, बांगलादेशचा वेगवान गोलंदाज इबादोत हुसेन गेल्या महिन्यात अफगाणिस्तानविरुद्धच्या वनडे मालिकेत गुडघ्याच्या दुखापतीमुळे आगामी आशिया चषक स्पर्धेतून बाहेर पडला होता. त्याच्या जागी वेगवान गोलंदाज तंजीम हसनचा समावेश करण्यात आला आहे. आपल्या पहिल्या सामन्यात फलंदाजी करताना तंजीम हसनने अवघ्या ८ चेंडूत १४ धावांची नाबाद खेळी केली. या खेळीत त्याने एक चौकार आणि एक षटकारही मारला.गेल्या मोसमात अबाहानी लिमिटेडला ढाका प्रीमियर लीग जिंकून देण्यासाठी त्याने १७ विकेट्स घेतल्या होत्या. तंजीम हा वरिष्ठ संघात सामील होणारा २०२० अंडर-१९ विश्वचषक विजेत्या संघाचा नववा सदस्य आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व क्रीडा, वर्ल्डकप २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Who is tanzim hasan shakib took the wickets of rohit sharma and tilak verma in the debut match vbm

First published on: 15-09-2023 at 22:34 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×