scorecardresearch

भारताच्या ‘या’ अष्टपैलू खेळाडूने IPL मध्ये कोट्यावधी रुपयांचा जमवला गल्ला; IPL इतिहासातील एकमेव क्रिकेटर

Most Earning All Rounder In IPL History : आयपीएलच्या इतिहासात सर्वात जास्त कमाई करणारा विदेशी खेळाडू नसून एक भारतीय खेळाडू आहे.

Most Earning All Rounder In IPL
IPL मध्ये या खेळाडूने केली सर्वात जास्त कमाई. (Image-Indian Express)

Most Earning In Indian Premier League : जगतील सर्वात श्रीमंत क्रिकेट लीगमधून इंडियन प्रीमियर लीगचा दबदबा आहे. या आयपीएलमध्ये कोट्यावधी रुपये खर्च करून खेळाडूंना खरेदी केलं जातं. यावेळीही आयपीएलच्या मेगा ऑक्शनमध्ये फॅंचायजिने अष्टपैलू खेळाडूंवर कोट्यावधी रुपयांचा वर्षाव केला आहे. पण तु्म्हाला माहितीय, आयपीएलमध्ये आजपर्यंत सर्वात जास्त कमाई कोणत्या अष्टपैलू खेळाडूने केली आहे? जाणून घेऊयात याबाबत सविस्तर माहिती.

या अष्टपैलू खेळाडूने केलीय सर्वात जास्त कमाई

आयपीएलच्या इतिहासात सर्वात जास्त कमाई करणारा विदेशी खेळाडू नसून एक भारतीय खेळाडू आहे. आयपीएलच्या इतिहासात आजपर्यंत सर्वात जास्त ज्या अष्टपैलू खेळाडूने कमाई केलीय, त्याचं नाव आहे भारताचा स्टार खेळाडू रविंद्र जडेजा. चेन्नई सुपर किंग्जसाठी खेळणाऱ्या रविंद्र जडेजाने इतके पैसे कमवले आहेत की, त्याच्या जवळपासही कुणी नाहीय. मनीबॉलच्या रिपोर्टनुसार, जडेजाने आयपीएलमध्ये आतापर्यंत १०९ कोटींहून अधिक कमाई केली आहे. जडेजा आयपीएलमध्ये १०० कोटी कमावणारा पहिला अष्टपैलू खेळाडू ठरला आहे.

नक्की वाचा – IPL History: …म्हणून ‘या’ चार खेळाडूंचं क्रिकेट करिअर झालं खराब, जाणून घ्या यामागचं नेमकं कारण

टॉप – ५ मध्ये भारतीय अष्टपैलू खेळाडू

आयपीएलमध्ये सर्वात जास्त कमाई करणाऱ्या ५ अष्टपैलू खेळाडूंबाबत बोलायचं झालं तर, यामध्ये भारताच्या दोन क्रिकेटर्सचा समावेश आहे. जडेजाने १०० कोटींची कमाई करून या लिस्टमध्ये अव्वल स्थान गाठलं आहे. तर आरसीबीचा मॅक्सवेल या लिस्टमध्ये दुसऱ्या स्थानावर आहे. त्याने आतापर्यंत ८५ कोटी रुपये कमाई केली आहे. तर तिसऱ्या नंबरवर भारतीय अष्टपैलू खेळाडू रविचंद्रन आश्विनच्या नावाची नोंद आहे. आश्विनने ८२ कोटी रुपये कमावले आहेत. तर चौथ्या नंबरवर ८० कोटींची कमाई करणारा सीएसकेचा बेन स्टोक आहे. तर पाचव्या नंबरवर मुंबई इंडियन्सचा कायरन पोलार्ड आहे. त्याने ८० कोटींची कमाई केली आहे. पंरतु, पोलार्ड आता आयपीएल सामने खेळणार नाही.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 29-03-2023 at 21:08 IST

संबंधित बातम्या