PM Modi In Australia Visit: पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या ऑस्ट्रेलियात असून त्यांनी तेथे राहणाऱ्या भारतीयांची भेट घेतली. एरिना स्टेडियमवर हजारो भारतीयांसमोर पीएम मोदींनी केवळ आपल्या लोकांबद्दलच बोलले नाही तर दोन्ही देशांमधील संबंधांवरही ते खुलेपणाने बोलले. दिवंगत महान क्रिकेटपटू शेन वॉर्नबद्दल स्टेडियममध्ये बोलताना ते म्हणाले की, “भारतीय लोक एखाद्या प्रिय व्यक्तीला गमावल्यासारखे शोक करीत आहेत.”

खेळांमधील नातेसंबंधाबद्दल बोलताना ते म्हणाले की, “आमच्या क्रिकेटच्या नात्यालाही ७५ वर्षे पूर्ण झाली आहेत. क्रिकेटच्या मैदानावरील स्पर्धा जितकी रंजक असते, तितकीच मैदानाबाहेरची आमची मैत्री अधिक घट्ट असते. यावेळी ऑस्ट्रेलियातील अनेक महिला क्रिकेटपटूही पहिल्यांदाच आयपीएल खेळण्यासाठी भारतात आल्या होत्या. यावेळी प्रथमच महिला आयपीएल म्हणजेच महिला प्रीमियर लीगचे आयोजन करण्यात आले होते, ज्यामध्ये मेग लॅनिंग, एलिस पेरी आणि अॅलिसा हिली यांच्यासह अनेक क्रिकेटपटूंनी भाग घेतला होता.”

शेन वॉर्नची आठवण करून देताना मोदी म्हणाले, “असे नाही की आपण फक्त आनंदाचे साथीदार आहोत. चांगला मित्र नेहमी सुखात आणि दु:खात सोबती असतो. गेल्या वर्षी महान शेन वॉर्नचे निधन झाले तेव्हा ऑस्ट्रेलियासह करोडो भारतीयांनी शोक व्यक्त केला होता. जणू आपण कोणीतरी गमावलं होतं. ४ मार्च २०२२ रोजी वॉर्नचा अचानक मृत्यू झाला. शेन वॉर्न आयपीएलच्या पहिल्या सत्राचा विजेता राजस्थान रॉयल्सचा कर्णधार होता.”

क्रिकेटच्या मैदानावर सचिन तेंडुलकर आणि वॉर्न यांच्यातील टग ऑफ वॉर सगळ्यांनाच आवडले. त्यामुळेच ते भारतातही खूप प्रसिद्ध होते. वॉर्नचा मृत्यू झाला तेव्हा सचिन म्हणाला होता, “तू भारत आणि भारतीय लोकांमध्ये कायम जिवंत राहशील.” सचिनच्या आक्रमक फलंदाजीबद्दल वॉर्न म्हणाला होता की, “तो स्वप्नातही षटकार मारतो. मला खूप त्याची भीती वाटते.” सचिनने चेन्नईतील त्याला मारलेले रिव्हर्स स्वीप आणि स्वीप शॉट्समुळे तो खूपच बिथरला होता.

हेही वाचा: CSK vs GT: शमीने आपल्या गोलंदाजीवर झाडे लावली…; सामन्यांमध्ये डॉट बॉल्सऐवजी दिसत आहेत झाडाचे इमोजी, जाणून घ्या टाटांचा उपक्रम

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याच दिवशी अनुभवी यष्टिरक्षक रॉडनी मार्शचाही मृत्यू झाला. ऑस्ट्रेलियासाठी हा दुहेरी धक्का होता. वॉर्नने ट्विट करून आपल्या ज्येष्ठ ज्येष्ठ खेळाडूच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला होता. मोदी म्हणाले की, “दोन्ही देशांमध्ये भौगोलिक अंतर आहे, पण हिंदी महासागर त्यांना जोडतो, जीवनशैली वेगळी असू शकते, पण आता योगही त्यांना जोडतो. ते म्हणाले की, दोन्ही देश क्रिकेटशी फार पूर्वीपासून जोडले गेले आहेत, पण आता टेनिस आणि चित्रपटही दोन्ही देशांचे संबध अधिक दृढ झाले आहेत.”