सध्याचे भारतीय संघाचे प्रशिक्षक डंकन फ्डेचर यांची जागा भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली घेऊ शकतो. जर गॅरी कर्स्टन भारताचा प्रशिक्षक होऊ शकतो, तर गांगुली का नाही? पण हा निर्णय भारतीय क्रिकेट नियामक मंडळ आणि गांगुली यांच्यावर अवलंबून आहे, असे वक्तव्य भारताचे माजी क्रिकेटपटू गुंडप्पा विश्वनाथ यांनी एका खासगी  कार्यक्रमात केले. क्रिकेट क्लब ऑफ बंगालतर्फे (कॅब) त्यांचा गुरुवारी सत्कार करण्यात येणार आहे.