Rohit Sharma Talks About Ravichandran Ashwin : लंडनच्या ओव्हल मैदानात आज भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलचा महामुकाबला होत आहे. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. मागील काही दिवसांपासून टीम इंडियाच्या प्लेईंग ११ मध्ये कोणत्या खेळाडूंना संधी मिळणार, याबाबत अनेक चर्चा रंगल्या होत्या. अनुभवी गोलंदाज रविचंद्रन आश्विनचा टीम इंडियाच्या प्लेईंग ११ मध्ये समावेश करा, असा सल्लाही काही दिग्गज खेळाडूंनी दिला होता. मात्र, आज सुरु असलेल्या सामन्यात आश्विनला संधी न मिळाल्याने सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी नाराजीचा सूर आवळला आहे. या फायनलसाठी टीम इंडियाने चार वेगवाग गोलंदाज आणि एक फिरकीपटूला मैदानात उतरवलं आहे.

रविचंद्रन आश्विनला संघात सामील न करण्यामागे नेमकं काय कारण आहे, याबाबत रोहित शर्माने प्रतिक्रिया दिली आहे. नाणेफेक जिंकल्यानंतर रोहित म्हणाला, “आम्हाला प्रथम गोलंदाजी करायची होती. मी हा निर्णय येथील परिस्थिती आणि हवामानाचा अंदाज पाहून घेतला आहे. खेळपट्टीवर जास्त बदल पाहायला मिळेल, असं मला वाटत नाही. तुम्हाला चांगलं क्रिकेट खेळायचं आहे आणि अव्वल स्थानी जागा बनवायची आहे. आम्ही या सामन्यात चार वेगवाना गोलंदाज आणि एक फिरकीपटू घेऊन मैदानात उतरलो आहेत.

नक्की वाचा – WTC फायनलआधी टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माची मोठी घोषणा, म्हणाला, “कर्णधारपद सोडण्याआधी…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

फिरकीपटू रविंद्र जडेजा आहे. रविचंद्रन आश्विनला संघातून बाहेर काढण्याचा निर्णय खूप कठीण असतो. कारण त्याने मागील अनेक वर्षांमध्ये आमच्या संघासाठी मॅच विनिंग कामगिरी केली आहे. पण संघाला जो निर्णय योग्य वाटतो, तोच निर्णय घेतला जातो. रहाणेचा संघात समावेश झाल्यानं आमच्या संघाला अनुभवी खेळाडू मिळाला आहे. कारण त्यानेही ८० कसोटी सामने खेळले आहेत आणि संघासाठी चांगली कामगिरी केली आहे.”