दुहेरीच्या जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान पटकावण्यासाठी जितके श्रम घ्यावे लागले, त्याहून अधिक श्रम ते टिकवण्यासाठी घ्यावे लागतील याची जाण भारताची टेनिसपटू सानिया मिर्झाला आहे. त्यामुळेच या स्थानावर कायम राहण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचा निर्धार तिने व्यक्त केला. ती म्हणाली, ‘‘अव्वल स्थान टिकवण्यासाठी अधिकाधिक मेहनत घेणार आहे व शक्य होईल तितके दिवस ते कायम राखण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यासाठी काहीही करण्याचा माझा प्रयत्न असेल.’’ हैदराबादमध्ये सुरू असलेल्या फेड चषक स्पध्रेत शनिवारी रात्री भारताने फिलिपाइन्स संघावर विजय मिळवला आणि दुसऱ्या गटातून पहिल्या गटात प्रवेश निश्चित केला.
संग्रहित लेख, दिनांक 20th Apr 2015 रोजी प्रकाशित
अव्वल स्थान टिकवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्नशील – सानिया
दुहेरीच्या जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान पटकावण्यासाठी जितके श्रम घ्यावे लागले, त्याहून अधिक श्रम ते टिकवण्यासाठी घ्यावे लागतील याची जाण भारताची टेनिसपटू सानिया मिर्झाला आहे.
First published on: 20-04-2015 at 02:06 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Will do all i can to remain number one sania mirza