३० ऑक्टोबरला भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी२० विश्वचषक २०२२ मधील तिसरा सामना खेळला. पर्थ मैदानात खेळल्या गेलेल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने भारताचा पाच गडी राखून पराभव केला. यानंतर दक्षिण आफ्रिका संघ उपांत्य फेरीच्या एक पाऊल जवळ गेला आहे. या पराभवानंतर आजच्या बांग्लादेश विरुद्धच्या सामान्यातून भारताला पुनरागमन करायचे आहे. दरम्यान, यष्टीरक्षक-फलंदाज दिनेश कार्तिक याच्या दुखापतीच्या बाबतीत मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी मोठा खुलासा केला आहे.

आजच्या सामन्याच्या आधी भारतीय संघाचे प्रशिक्षक राहून द्रविड यांनी एक पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी दिनेश कार्तिकच्या दुखपतीच्याबाबतीत मोठा खुलासा केला आहे. दक्षिण आफ्रिकाविरुद्धच्या सामन्यात दिनेश कार्तिकच्या पाठीला दुखापत झाली होती. यानंतर राहुल द्रविड म्हणाले, “दिनेश पूर्णपणे ठिक आहे. त्याने सराव केला आहे. यानंतर त्याची दुखापण जास्त गंभीर नसल्याचे निदर्शनास आले आहे. मात्र, सामन्याच्या वेळेसच यासंबंधी अंतिम निर्णय घेतला जाईल.”

दिनेश कार्तिकच्या खराब प्रदर्शनाबाबतही राहुल द्रविड यांनी सांगितले की, “दिनेशला अधिक चेंडू खेळायला मिळाले नाहीत. पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात त्याने केवळ एक चेंडू खेळला, तर नेदरलँड विरुद्ध त्याला एकाही चेंडूचा सामना करता आला नाही. दक्षिण आफ्रिकेच्या सामन्यात त्याने सूर्यकुमार यादवबरोबर ४० चेंडूत ५२ धावांची भागीदारी केली.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दिनेश कार्तिकने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात १५ चेंडूमध्ये केवळ ६ धावा केल्या. अशा परिस्थितीत त्याच्या खराब फॉर्मबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, ‘ग्रुप बी’मध्ये ४ गुण मिळवून भारत गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे तर सारखेच गुण मिळवून बांग्लादेश तिसऱ्या स्थानावर आहे. दक्षिण आफ्रिका ५ गुण मिळवून गुणतालिकेत पाहिल्या स्थानावर आहे.