महाराष्ट्राने बलाढय़ रेल्वे संघावर सुपर ओव्हरद्वारा मात करीत महिलांच्या राष्ट्रीय ‘अ’ श्रेणी ट्वेन्टी२० स्पर्धेत सनसनाटी विजय नोंदविला. स्पर्धेतील अन्य लढतीत ओडिशाने गुजरातवर सहा गडी राखून मात केली.
प्रथम फलंदाजी करताना रेल्वे संघाने २० षटकांत ६ बाद ११३ धावा केल्या. त्यामध्ये हरमानप्रीत कौर हिने सर्वाधिक ३६ धावा टोलविल्या. विजयासाठी ११४ धावांचे आव्हानास सामोरे जाताना महाराष्ट्राने ५ बाद ११३ धावा केल्या. दोन्ही संघांच्या समान धावा झाल्या मात्र महाराष्ट्राने एक विकेट कमी गमावल्यामुळे महाराष्ट्रास विजयी घोषित करण्यात आले. महाराष्ट्राकडून कर्णधार स्मृती मंधाना (३७) व श्वेता माने (नाबाद ३०) या विजयाच्या शिल्पकार ठरल्या.
अन्य लढतीत ओडिशाने गुजरातवर विजय मिळवला.
संग्रहित लेख, दिनांक 15th Jan 2015 रोजी प्रकाशित
महाराष्ट्राची रेल्वेवर मात
महाराष्ट्राने बलाढय़ रेल्वे संघावर सुपर ओव्हरद्वारा मात करीत महिलांच्या राष्ट्रीय ‘अ’ श्रेणी ट्वेन्टी२० स्पर्धेत सनसनाटी विजय नोंदविला.
First published on: 15-01-2015 at 03:40 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Womens t20 cricket maharashtra vs railway