भारताची ‘फुल’राणी सायना नेहवालने नुकताच सय्यद मोदी स्पर्धेचा चषक उंचावला आणि आपली गेल्या १५ महिन्यांपासून सुरू असलेली पराभवी मालिका खंडीत केली. यावर बोलताना, खराब कामगिरीचा मी माझ्यावर कोणताही परिणाम होऊ देत नाही. माझे नेहमी भविष्यावर लक्ष असते असे सायनाने म्हटले आहे.
सय्यद मोदी बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पी.व्ही सिंधुवर मात करत सायनाने विजेतेपदावर नाव कोरले. गेले वर्ष माझ्यासाठी आव्हानात्मक ठरले पण, यावर्षी मी त्या सर्व पराभवाच्या जखमांना विसरून भविष्यावर लक्ष केंद्रीत केले आणि तसाही पराभवाचा परिणाम स्वत:वर होऊ देणे हे मी टाळत आली आहे. माझे फक्त भविष्यावर लक्ष असते असेही सायना सांगते.
अखेर सायनाला सूर गवसला!
एका मुलाखती दरम्यान सायना म्हणाली की, जेव्हा तुम्ही उच्च दर्जेसाठी ओळखले जाता. तेव्हा तुमच्याकडून सुमार कामगिरी होणे अपेक्षित नसते आणि खराब कामगिरी झाल्याचे दु:खही आपल्याला होते. त्यात दुखापतग्रस्त असल्यानंतर भविष्यातील स्पर्धेंचा विचार करून आराम घेणे महत्वाचे होते. म्हणून मी कोरिआ ओपन स्पर्धेला न जाण्याचे ठरविले. पुढील कॉमनवेल्थ, आशिया, इंडिया ओपन स्पर्धेत दमदार कामगिरी करण्याच्या हेतूने मी आराम घेतला. आता मी पूर्णपणे सज्ज आणि तंदरुस्त आहे. यावर्षी भरपूर विजेतीपदे मिळवायची आहेत असेही सायना म्हणाली.
संग्रहित लेख, दिनांक 29th Jan 2014 रोजी प्रकाशित
खराब कामगिरीकडे दुर्लक्ष; माझे नेहमी भविष्यावर लक्ष- सायना
भारताची 'फुल'राणी सायना नेहवालने नुकताच सय्यद मोदी स्पर्धेचा चषक उंचावला आणि आपली गेल्या १५ महिन्यांपासून सुरू असलेली पराभवी मालिका खंडीत केली.

First published on: 29-01-2014 at 02:51 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Wont let poor form affect me focussed on future saina