टी-२० विश्वचषक स्पर्धेमध्ये आज दक्षिण आफ्रिकेच्या पराभवामुळे पाकिस्तानचा उपांत्य फेरीचा मार्ग सुखकर झाला. नेदरलँड्सने दक्षिण आफ्रिकेचा अनपेक्षितरित्या १३ धावांनी पराभव केल्यानंतर पुढच्याच सामन्यात पाकिस्तानने बांगलादेशला पराभूत करत उपांत्य फेरीमधील स्थान निश्चित केलं. दक्षिण आफ्रिकेच्या पराभवानंतर पाकिस्तानी चाहत्यांकडून आनंद व्यक्त केला जात असतानाही भारताचा माजी क्रिकेटपटू वसीम जाफरने ट्वीटरवरुन पाकिस्तानी चाहत्यांना ट्रोल केलं आहे.

नक्की वाचा >> World Cup Final: …तर भारत-पाकिस्तान ड्रीम फायनल्स! पुढचा रविवार ठरणार ‘सुपर संण्डे’; समजून घ्या नेमकं गणित

वसीम जाफर हा त्याच्या मिम्स आणि ट्वीटरवरील हजरजबाबीपणासाठी ओळखला जातो. सामन्यांदरम्यान भन्नाट पोस्ट करणारा जाफर हा नेटकऱ्यांचा लाडका आहे. क्रिकेट कारकिर्दीमध्ये काहीसा दुर्लक्षित राहिलेला जाफर हा सध्या ट्वीटरवर ट्रेण्डींगही असतो. पाकिस्तान उपांत्य फेरीसाठी पात्र ठरण्याच्या आशा पल्लवीत झाल्यानंतर वसीमने एक मजेशीर व्हिडीओ पोस्ट केला आहे. मिम्स आणि मनोरंजक व्हिडीओ सातत्याने पोस्ट करत मिश्लिक पद्धतीने भाष्य करत शाब्दिक षटकार लगावणाऱ्या वसीमने यंदाही आपल्या मजेदार ट्वीटचा षटकार थेट सीमेपार धाडला आहे.

नक्की वाचा >> World Cup 2022: “…तोच संघ वर्ल्डकप जिंकेल”; भारतीय संघाचा उल्लेख करत Semi-Finals आधी स्टुअर्ट ब्रॉडचं सूचक विधान

जाफरने ट्वीट केलेल्या व्हिडीओमध्ये एका टीव्ही शोवरील कार्यक्रमात पाकिस्तानी व्यक्ती फुटबॉल विश्वचषकासाठी लिहिलेलं वाका वाका गाणं गाताना दिसत आहे. मात्र मूळ शब्दांऐवजी अगदी वाटेल त्या शब्दांमध्ये ही व्यक्ती गात असून यामध्ये दक्षिण आफ्रिकेचाही उल्लेख आहे. वसीम जाफरने हा व्हिडीओ, “पाकिस्तान आणि बांगलादेशचे संघांच्या चाहत्यांची सध्याची स्थिती” असं म्हणत पोस्ट केला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हे मूळ गाण शकीरा या अमेरिकन गायिकेनं २०१० साली झालेल्या फुटबॉल विश्वचषकासाठी गायलं होतं. ही स्पर्धा दक्षिण आफ्रिकेमध्ये पार पडली होती. त्यामुळे दक्षिण आफ्रिका या थिमवर हे गाणं होतं. याच गाण्याचं हे पाकिस्तानी व्हर्जन वसीमने अगदी मजेदार पद्धतीने वापरलं आहे. तीन हजारांहून अधिक वेळा हे ट्वीट रिट्वीट करण्यात आलं आहे.