ICC World Cup 2023: अफगाणिस्तानचा स्टार फिरकीपटू राशिद खानने पाकिस्तानविरुद्धच्या विश्वचषक २०२३ सामन्यापूर्वी चेन्नईमध्ये एम.एस. धोनीची भेट घेतली. राशिदने एम.एस. धोनीबरोबरचा त्याचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आणि त्याला कॅप्शन दिले, “माही भाई@mahi7781 तुम्हाला भेटून नेहमीच आनंद होतो.” धोनीचे जगभरात असंख्य चाहते आहेत, त्यामुळेच त्याचे चाहते त्याला भेटायला येतात आणि तोही सर्वांना भेटतो.

आपल्या प्रभावी लेग स्पिनसाठी ओळखल्या जाणारा फिरकीपटू राशिद खानने २०२३च्या विश्वचषकात अफगाणिस्तानच्या कामगिरीत महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्याने तीन विकेट्स घेत अफगाणिस्तानला इंग्लंडविरुद्धच्या विजयात मोलाची भूमिका बजावण्यात मदत केली. न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात त्याच्या सहकाऱ्यांचा पाठिंबा नसणे यासारख्या काही आव्हानांना तोंड देत असतानाही राशिदची कामगिरी वाखाणण्याजोगी आहे.

Kolkata Knight Riders Vs Lucknow Supergiants Match Updates in Marathi
KKR vs LSG : कोलकाताविरुद्धच्या सामन्यासाठी लखनऊच्या संघाने जर्सीचा रंग का बदलला? जाणून घ्या
Despite the efforts of PR Sreejesh the Indian hockey team lost
श्रीजेशच्या प्रयत्नांनंतरही भारतीय हॉकी संघाचा पराभव
IPL 2024 Royal Challenger Bengaluru vs Lucknow Super Giants Match Updates in Marathi
IPL 2024: मयंक यादवचा सामना करायला ऑस्ट्रेलियाचा दिग्गज उत्सुक
babar azam became again captain of pakistan cricket team
बाबर पुन्हा पाकिस्तानचा कर्णधार

अफगाणिस्तानने माजी विश्वविजेत्या इंग्लंडचा ६९ धावांनी पराभव करून आपला सर्वात धक्कादायक असा विजय संपादन केला. अफगाणिस्तानचा विश्वचषकातील १८ सामन्यांमधला हा दुसरा विजय आहे, २०१५च्या विश्वचषक मोहिमेदरम्यान स्कॉटलंडविरुद्ध पहिला विजय नोंदवला होता. गुरबाज आणि जादरण यांच्यातील ११४ धावांच्या भागीदारीमुळे संघाने न्यूझीलंडविरुद्ध दमदार सुरुवात केली. त्याची कामगिरी ही क्रिकेटबद्दल कमालीची आवड असलेल्या देशासाठी अभिमानाची बाब ठरली आहे.

२०२२च्या आयपीएल भव्य लिलावापूर्वी गुजरात टायटन्सने १५ कोटी रुपयांना शॉर्टलिस्ट केलेला राशिद खान अफगाणिस्तानसाठी महत्त्वाचा खेळाडू आहे. त्याचे मैदानावरील योगदान आणि मैदानाबाहेर त्याच्या देशाला मदत करण्याची त्याची वचनबद्धता, ज्यामध्ये अफगाणिस्तान भूकंपानंतर मदतकार्यासाठी स्पर्धेसाठीची त्याची मॅच फी दान करणे, यातून तो खरा सुपरस्टार आहे हे दर्शवतो.

हेही वाचा: IND vs BAN: चेतेश्वर पुजाराने विराट कोहलीच्या शतकावर साधला निशाणा; म्हणाला, “मग तुम्ही पश्चातापाशिवाय…”

गुणतालिकेत ऑस्ट्रेलिया पहिल्या चारमध्ये, पाकिस्तान पाचव्या स्थानावर

नेदरलँड्सविरुद्धच्या सामन्यापूर्वी, दक्षिण आफ्रिकेने दोन शानदार विजय मिळवले होते आणि त्यापैकी एका सामन्यात ४००+ धावा केल्या होत्या. मात्र, आफ्रिकेला नेदरलँड्सविरुद्ध धक्कादायक पराभवाचा सामना करावा लागला. आफ्रिकन संघ तीन सामन्यात मिळून दोन विजय आणि एक पराभवासह चार गुण मिळवत तिसऱ्या स्थानावर आहे. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियन संघाने यापूर्वी श्रीलंकेचा पराभव करून नवव्या क्रमांकावरून सहाव्या स्थानावर झेप घेतली होती. यानंतर पाकिस्तानचा पराभव करून संघ सहाव्या स्थानावरून थेट चौथ्या स्थानावर पोहोचला. त्याचा नेट रनरेट पाकिस्तानपेक्षा चांगला झाला आहे. दोन्ही संघांनी प्रत्येकी चार सामने खेळले असून दोघांचे दोन विजय आणि दोन पराभवांसह आठ गुण आहेत. ऑस्ट्रेलियाचा निव्वळ धावगती -०.१९३ आणि पाकिस्तानचा -०.४५६ आहे. इंग्लंड तीन विजय आणि दोन पराभवांतून दोन गुणांसह पाचव्या स्थानावर आहे, तर बांगलादेशचे चार गुणांतून दोन गुण आहेत. त्यांनी एक सामना जिंकला असून तीन पराभव पत्करले आहेत. नेदरलँड एक विजय आणि तीन पराभवांसह आठव्या तर अफगाणिस्तान एक विजय आणि चार पराभवांसह नवव्या स्थानावर आहे. श्रीलंकेचे खाते अद्याप उघडलेले नाही. तीन सामन्यांत तीन पराभवांसह श्रीलंकेचा संघ गुणतालिकेत तळाच्या दहाव्या स्थानावर आहे.