जागतिक कुस्ती स्पर्धा बुडापेस्ट : रविंदरने ६१ किलो वजनी गटाची अंतिम फेरी गाठून २३ वर्षांखालील वयोगटाच्या जागतिक अजिंक्यपद कुस्ती स्पध्रेतील भारताचे पहिले पदक निश्चित केले आहे.
२२ वर्षीय रविंदरने उपांत्य लढतीत अर्मेनियाच्या अर्सेन हारूटयुनॅनचा ४-३ असा पराभव केला. रविंदरने पहिल्या सामन्यात हंगेरीच्या बुडाय कोव्हॅक्सला १२-१ अशा फरकाने नमवले, मग उपांत्यपूर्व सामन्यात रशियाच्या डिनिस्लॅम टॅखटॅरोव्हचा ११-० असा पाडाव केला. ७४ किलो वजनी गटात गौरव बलियानला रॅपिचेजद्वारे पदकाची संधी चालून आली आहे.