मुंबई इंडियन्सची कर्णधार हरमनप्रीत कौरने महिला प्रीमियर लीग २०२३ मधील लहान सीमारेषेच्या वादावर तिने उत्तर देण्यास नकार दिला आहे.  तिच्यामते पुढील हंगामापासून चौकार-षटकरांची सीमा मर्यादा वाढवायची की नाही हे खेळाडूंनी ठरवायचे नाही. BCCI च्या सूचनेनुसार, WPL पहिल्यावहिल्या हंगामामध्ये सीमारेषेचा आकार कमाल ६० मीटरपर्यंत कमी करण्यात आला. गेल्या महिन्यात झालेल्या टी२० वर्ल्डकपपेक्षा पाच मीटरने कमी ठेवण्यात आली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अधिक मोठ्या धावसंख्येचे सामने आणि चाहत्यांच्या गर्दीसाठी तसेच मनोरंजन सुनिश्चित करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला होता. याच कारणासाठी स्पर्धेची दोन्ही ठिकाणे नवी मुंबईतील डी.वाय. पाटील स्टेडियम आणि ब्रेबॉर्न स्टेडियम येथे ४२-४४ मीटरवर सीमारेषा आणल्या गेल्या. परिणामी, अनेक फलंदाजांनी लहान सीमारेषेचा जास्तीत जास्त वापर केला चौकार-षटकारांचा पाऊस पाडला आणि २००+ स्कोअर सहजतेने गाठले.

हेही वाचा: WPL 2023: “WPL फायनलमध्ये आज शफाली वर्मा…”, दिल्ली कॅपिटल्सची कर्णधार मेग लॅनिंगचे सूचक विधान

याविषयी प्रश्न विचारला असता हरमनप्रीतने रविवारी (२६ मार्च) डब्ल्यूपीएल फायनलपूर्वी दिल्ली कॅपिटल्सची कर्णधार मेग लॅनिंगसोबत तिच्या संयुक्त मीडिया कॉन्फरन्समध्ये हसत हसत उत्तर दिले. “हम लोगो ने थोडी ना दोरी लगाया है. जिनहोने दोरी लगाया है आप उनको पूछो ना. (आम्ही सीमारेषेची रस्सी लावली नाही. तुम्ही हे कोणी केले असेल ते तुम्ही विचारू शकता). ते आपल्या हातात नाही ना? अधिकाऱ्यांच्या हाती आहे. तुम्ही त्यांच्याशी बोलू शकता. दोन्ही कर्णधारांनी आशा व्यक्त केली की महिला प्रीमियर लीग ही भारतीय क्रिकेटमध्ये काहीतरी खास सुरू आहे.

लॅनिंग म्हणाली, “WBBL ने ऑस्ट्रेलिया आणि जगभरातील क्रिकेटच्या विकासात मोठी भूमिका बजावली आहे. हे खेळाडूंना उत्तम संधी प्रदान करते आणि मोठ्या खेळांमध्ये प्रत्येकाला दबावाच्या परिस्थितीत कामगिरी करण्याची गरज असते, जेव्हा ते खरोखर महत्त्वाचे असते. ऑस्ट्रेलियन संघ म्हणून आम्हाला मिळालेल्या यशात त्याचा मोठा वाटा आहे आणि येथे WPL चा भाग असल्याने मला वाटते की हे अगदी समान आहे.” ती पुढे म्हणाली, “काही स्थानिक भारतीय खेळाडूंना जाणून घेणे आणि त्यांच्यासोबत काम करून भारतात आणि जगभरातील क्रिकेटचा विकास करणे खूप चांगले आहे.”

हेही वाचा: IPL 2023: पंजाब किंग्जला मोठा धक्का, जॉनी बेअरस्टो आयपीएलमधून बाहेर; ‘या’ ऑस्ट्रेलियन खेळाडूचा संघात समावेश

हरमनप्रीतने लॅनिंगच्या दृष्टिकोनाला समर्थन दिले, तसेच पुढील काही वर्षांत देशाला बदल पाहण्यास सक्षम असावे असे जोडले. याबाबत बोलताना ती म्हणते, “WBBL ने त्यांच्या देशात क्रिकेटच्या विकासात मोठी भूमिका बजावली आणि WPL चीही आमच्या क्रिकेटसाठी तीच भूमिका असणार आहे. देशांतर्गत खेळाडूंना खूप संधी मिळणार आहेत, अनेक मुलींनी चांगली कामगिरी केली आहे. आम्ही २-३ वर्षांत परिणाम पाहण्यास सुरवात करू. मला विश्वास आहे की भारतीय प्रतिभावान खेळाडू देखील ऑस्ट्रेलियाप्रमाणे चांगली कामगिरी करेल.”

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Wpl 2023 hum logo ne thodi na rassi lagayi thi harmanpreets sharp reply on maximum number of fours sixes in inaugural wpl avw
First published on: 26-03-2023 at 14:33 IST