WPL 2023 updates MI-W vs UPW-W : मुंबईच्या बेब्रॉन स्टेडियममध्ये मुंबई इंडियन्स आणि यूपी वॉरियर्स यांच्यात महिला प्रीमियर लीगचा १० वा सामना रंगला. यूपीची कर्णधार अॅलिसा हिलीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर मैदानात उतरलेल्या यूपीच्या फलंदाजांची मुंबईच्या सायका इशाक आणि केरच्या भेदक गोलंदाजीनं पुरती दमछाक केली. पण कर्णधार अॅलिसा आणि तेहलियाने आक्रमक खेळी करून अर्धशकत ठोकलं. त्यामुळं यूपीच्या धावसंख्येचा आलेख चढता राहिला. यूपीने २० षटकांत ५ विकेट्स गमावत १५९ धावा केल्या. त्यानंतर १६० धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या मुंबईच्या फलंदाजांनी यूपीच्या गोलंदाजांचा धुव्वा उडवला. यास्तिका भाटिया, कर्णधार हरमनप्रीत कौर आणि सिवर-ब्रंटच्या आक्रमक फलंदाजीमुळं यूपीचा दारुण पराभव झाला. हरमनप्रीतने ३३ चेंडूत ५३ धावा कुटल्या. यास्तिकाने २७ चेंडूत ४२ तर सिवरने ३१ चेंडूत ४२ धावांची खेळी साकारत मुंबईला महिला प्रीमियर लीगमध्ये सलग चौथा विजय मिळवून दिला. मुंबईने १७.३ षटकात २ गडी गमावर १६४ धावा करून यूपीचा पराभव केला.

युपीची फलंदांज किरण नवगिरेने आक्रमक खेळी करण्यास सुरुवात केली होती. पण मुंबईची गोलंदाज अमेलिया केरने किरणच्या फलंदाजीला ब्रेक लावला. १७ धावांवर असताना यास्तिका भाटियाने किरणचा झेल घेतला. १३ षटकांच्या खेळानंतर यूपीची धावसंख्या ११३-२ अशी झाली होती. पण कर्णधार अॅलिसा हिली मैदानात तग धरुन होती. मागच्या सामन्यात अॅलिसाने आक्रमक खेळी केली होती. आजच्या सामन्यातही अॅलिसा मोठी खेळी करत सलग दुसरं अर्धशतक ठोकलं. त्यानंतर तेहलियाने अर्धशतकी खेळी केली. पण सायका इशाकच्या गोलंदाजीवर दोन्ही आक्रमक फलंदाज बाद झाले. कर्णधार अॅलिसाने ४६ चेंडूत ५८ धावा केल्या. तर तेहलियाने ३७ चेंडूत ५० धावा कुटल्या. १८ षटकानंतर १४६-५ अशी यूपीची धावसंख्या झालीय. तर हेली मॅथ्यूजने सोफीला बाद करत यूपीला पाचवा धक्का दिला.

Live Updates

Mumbai Indians Women (MI-W) vs Delhi Capital Women (DC-W) Highlights Updates: मुंबई इंडियन्स महिला विरुद्ध यूपी वॉरियर्स महिला लाईव्ह

23:02 (IST) 12 Mar 2023
कर्णधार हरमनप्रीतने ठोकलं अर्धशतक, मुंबई इंडियन्सचा यूपी वॉरियर्सवर मोठा विजय

मुंबईच्या बेब्रॉन स्टेडियममध्ये मुंबई इंडियन्स आणि यूपी वॉरियर्स यांच्यात महिला प्रीमियर लीगचा १० वा सामना रंगला. यूपीची कर्णधार अॅलिसा हिलीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर मैदानात उतरलेल्या यूपीच्या फलंदाजांची मुंबईच्या सायका इशाक आणि केरच्या भेदक गोलंदाजीनं पुरती दमछाक केली. पण कर्णधार अॅलिसा आणि तेहलियाने आक्रमक खेळी करून अर्धशकत ठोकलं. त्यामुळं यूपीच्या धावसंख्येचा आलेख चढता राहिला.

यूपीने २० षटकांत ५ विकेट्स गमावत १५९ धावा केल्या. त्यानंतर १६० धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या मुंबईच्या फलंदाजांनी यूपीच्या गोलंदाजांचा धुव्वा उडवला. यास्तिका भाटिया, कर्णधार हरमनप्रीत कौर आणि सिवर-ब्रंटच्या आक्रमक फलंदाजीमुळं यूपीचा दारुण पराभव झाला. हरमनप्रीतने ३३ चेंडूत ५३ धावा कुटल्या. यास्तिकाने २७ चेंडूत ४२ तर सिवरने ३१ चेंडूत ४२ धावांची खेळी साकारत मुंबईला महिला प्रीमियर लीगमध्ये सलग चौथा विजय मिळवून दिला. मुंबईने १७.३ षटकात २ गडी गमावर १६४ धावा करून यूपीचा पराभव केला.

23:00 (IST) 12 Mar 2023
मुंबई इंडियन्सचा यूपी वॉरियर्सवर दणदणीत विजय, कर्णधार हरमनप्रीतची आक्रमक खेळी

मुंबईच्या बेब्रॉन स्टेडियममध्ये मुंबई इंडियन्स आणि यूपी वॉरियर्स यांच्यात महिला प्रीमियर लीगचा १० वा सामना रंगला. यूपीची कर्णधार अॅलिसा हिलीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर मैदानात उतरलेल्या यूपीच्या फलंदाजांची मुंबईच्या सायका इशाक आणि केरच्या भेदक गोलंदाजीनं पुरती दमछाक केली. पण कर्णधार अॅलिसा आणि तेहलियाने आक्रमक खेळी करून अर्धशकत ठोकलं. त्यामुळं यूपीच्या धावसंख्येचा आलेख चढता राहिला. यूपीने २० षटकांत ५ विकेट्स गमावत १५९ धावा केल्या. त्यानंतर १६० धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या मुंबईच्या फलंदाजांनी यूपीच्या गोलंदाजांचा धुव्वा उडवला. यास्तिका भाटिया, कर्णधार हरमनप्रीत कौर आणि सिवर-ब्रंटच्या आक्रमक फलंदाजीमुळं यूपीचा दारुण पराभव झाला. हरमनप्रीतने ३३ चेंडूत ५३ धावा कुटल्या. यास्तिकाने २७ चेंडूत ४२ तर सिवरने ३१ चेंडूत ४२ धावांची खेळी साकारत मुंबईला महिला प्रीमियर लीगमध्ये सलग चौथा विजय मिळवून दिला. मुंबईने १७.३ षटकात २ गडी गमावर १६४ धावा करून यूपीचा पराभव केला.

22:38 (IST) 12 Mar 2023
WPL 2023 Live Updates : कर्णधार हरमनप्रीतने ठोकलं अर्धशतक,१७ षटकांनंतर मुंबई १५३-२

मुंबईची सलामी जोडी यास्तिका भाटिया आणि हेली मॅथ्यूज बाद झाल्यानंतर कर्णधार हरमनप्रीतने सावध खेळी करत मुंबईची धुरा सांभाळली. तर सिवर-ब्रंटने चौफेर फटकेबाजी करत यूपीच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. त्यामुळं १५ षटकानंतर मुंबईची धावसंख्या १२३-२ अशी झाली आहे.

https://twitter.com/wplt20/status/1634964934005235714?s=20

22:02 (IST) 12 Mar 2023
मुंबईच्या सलामी जोडीला सोफीने दाखवला पव्हेलियनचा रस्ता, १३ षटकानंतर मुंबई ९९-२

मुंबई इंडियन्ससाठी सलामीला मैदानात उतरलेल्या यास्तिका भाटिया आणि हेली मॅथ्यूजने यूपीच्या गोलंदाजांच्या नाकीनऊ आणले आहेत. कारण सावध खेळी करुन या दोन्ही फलंदाजांनी पॉवर प्ले मध्ये मुंबईची धावसंख्या पन्नाशी पार केलीय. यास्तिका आक्रमक अंदाजात खेळत असून चौफेर फटकेबाजी केली. पण राजेश्वरी गायकवाडच्या गोलंदाजीवर मोठा फटका मारल्याने ४२ धावांवर यास्तिका बाद झाली. तर हेलीने १७ चेंडूत १५ धावा केल्या. ९ षटकानंतर मुंबईची धावसंख्या ६४-२ अशी झाली आहे.

https://twitter.com/wplt20/status/1634954082384486400?s=20

21:30 (IST) 12 Mar 2023
मुंबई इंडियन्सच्या सलामीसाठी हेली मॅथ्यूज-यास्तिका भाटियाची जोडी मैदानात

युपी वॉरियर्सने २० षटकांत ६ विकेट्स गमावत १५९ धावा केल्या आहेत. त्यामुळे विजयासाठी मुंबई इंडियन्सपुढं १६० धावांचं आव्हान असणार आहे. मुंबई इंडियन्सची सलामी जोडी मैदानात उतरली आहे. हेली मॅथ्यूज आणि यास्तिका भाटिया यूपीच्या गोलंदाजांचा समाचार घेताना दिसत आहेत. ५ षटकानंतर मुंबईची धावसंख्या ४०-० अशी झाली आहे.

https://twitter.com/wplt20/status/1634945103444975617?s=20

20:56 (IST) 12 Mar 2023
सायका इशाकने पुन्हा गोलंदाजीत केली कमाल, ३ विकेट घेत यूपीची धावसंख्या रोखली

युपीची फलंदांज किरण नवगिरेने आक्रमक खेळी करण्यास सुरुवात केली होती. पण मुंबईची गोलंदाज अमेलिया केरने किरणच्या फलंदाजीला ब्रेक लावला. १७ धावांवर असताना यास्तिका भाटियाने किरणचा झेल घेतला. १३ षटकांच्या खेळानंतर यूपीची धावसंख्या ११३-२ अशी झाली होती. पण कर्णधार अॅलिसा हिली मैदानात तग धरुन होती. मागच्या सामन्यात अॅलिसाने आक्रमक खेळी केली होती. आजच्या सामन्यातही अॅलिसा मोठी खेळी करत सलग दुसरं अर्धशतक ठोकलं. त्यानंतर तेहलियाने अर्धशतकी खेळी केली. पण सायका इशाकच्या गोलंदाजीवर दोन्ही आक्रमक फलंदाज बाद झाले. कर्णधार अॅलिसाने ४६ चेंडूत ५८ धावा केल्या. तर तेहलियाने ३७ चेंडूत ५० धावा कुटल्या. १८ षटकानंतर १४६-५ अशी यूपीची धावसंख्या झालीय. तर हेली मॅथ्यूजने सोफीला बाद करत यूपीला पाचवा धक्का दिला.

https://twitter.com/wplt20/status/1634937248885125122?s=20

20:41 (IST) 12 Mar 2023
कर्णधार अ‍ॅलिसाने ठोकलं सलग दुसरं अर्धशतक, यूपीची धावसंख्या शंभरी पार

युपीची फलंदांज किरण नवगिरेने आक्रमक खेळी करण्यास सुरुवात केली होती. पण मुंबईची गोलंदाज अमेलिया केरने किरणच्या फलंदाजीला ब्रेक लावला. १७ धावांवर असताना यास्तिका भाटियाने किरणचा झेल घेतला. १३ षटकांच्या खेळानंतर यूपीची धावसंख्या ११३-२ अशी झाली होती. पण कर्णधार अॅलिसा हिली मैदानात तग धरुन आहे. मागच्या सामन्यात अॅलिसाने आक्रमक खेळी केली होती. आजच्या सामन्यातही अॅलिसा मोठी खेळी करत सलग दुसरं अर्धशतक ठोकलं. अॅलिसाने चौफेर फटकेबाजी करून अर्धशतकाला गवसणी घातली. १६ षटकानंतर यूपीची धावसंख्या १३८-२ अशी झालीय.

https://twitter.com/wplt20/status/1634935080283160578?s=20

20:23 (IST) 12 Mar 2023
WPL 2023 Live Updates : १३ षटकांनंतर यूपी वॉरियर्सची धावसंख्या ११३-२, कर्णधार अॅलिसा अर्धशतकाच्या उंबरठ्यावर

युपीची फलंदांज किरण नवगिरेने आक्रमक खेळी करण्यास सुरुवात केली होती. पण मुंबईची गोलंदाज अमेलिया केरने किरणच्या फलंदाजीला ब्रेक लावला. १७ धावांवर असताना यास्तिका भाटियाने किरणचा झेल घेतला. १३ षटकांच्या खेळानंतर यूपीची धावसंख्या ११३-२ अशी झालीय. पण कर्णधार अॅलिसा हिली मैदानात तग धरुन आहे. मागच्या सामन्यात अॅलिसाने आक्रमक खेळी केली होती. आजच्या सामन्यातही अॅलिसा मोठी खेळी करण्याच्या इराद्यात आहे.

https://twitter.com/wplt20/status/1634931479460605953?s=20

20:09 (IST) 12 Mar 2023
किरण नवगिरे आक्रमक फटका मारण्याच्या प्रयत्नात १७ धावांवर झाली बाद

युपीची फलंदांज किरण नवगिरेने आक्रमक खेळी करण्यास सुरुवात केली होती. पण मुंबईची गोलंदाज अमेलिया केरने किरणच्या फलंदाजीला ब्रेक लावला. १७ धावांवर असताना यास्तिका भाटियाने किरणचा झेल घेतला. ११ षटकांच्या खेळानंतर यूपीची धावसंख्या ९१-२ अशी झालीय.

https://twitter.com/wplt20/status/1634927188058443781?s=20

19:59 (IST) 12 Mar 2023
यूपी वॉरियर्सच्या फलंदाजांची सावध खेळी, पॉवर प्लेमध्ये धावसंंख्या १ बाद ४८

पहिल्याच षटकात यूपी वॉरियर्सला मोठा धक्का बसला. मुंबईची फिरकीपटू सायका इशाकने देविका वैद्यला ६ धावांवर पायचित केलं. पण त्यानंतर कर्णधार अॅलिसा हिली आणि किरण नवगिरेनं सावध खेळी करून यूपी वॉरियर्सला १ बाद ४८ धावांवर पोहोचवलं. सहाव्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर अॅलिसाने षटकार ठोकून आक्रमक खेळीला सुरुवात केली.

https://twitter.com/wplt20/status/1634924671471874049?s=20

19:44 (IST) 12 Mar 2023
सायका इशाकच्या फिरकीची जादू सुरुच, देविका ६ धावांवर झाली बाद

देविका वैद्य आणि कर्णधार अॅलिसा हिली यूपी वॉरियर्ससाठी सलामीच्या फलंदाज म्हणून मैदानात उतरल्या होत्या. पण गोलंदाजीत कमालीचा फॉर्म असलेली मुंबईची सायका इशाकने पुन्हा एकदा भेदक गोलंदाजी केली. सायकाने देविका वैद्यला पायचीत करून पॉवर प्ले मध्ये मुंबईला पहिला विकेट मिळवून दिला. ५ षटक संपल्यानंतर यूपीची धावसंख्या ३९-१ अशी झाली.

https://twitter.com/wplt20/status/1634920991246929920?s=20

19:36 (IST) 12 Mar 2023
सलामीसाठी देविका वैद्य आणि कर्णधार अ‍ॅलिसा हिली मैदानात

यूपी वॉरियर्सकडून सलामीसाठी देविका वैद्य आणि कर्णधार अॅलिसा हिली मैदानात उतरल्या आहेत. तर सिवर-ब्रंटने मुंबईच्या संघासाठी पहिल्या षटकात वेगवान मारा केला. सिवरला यूपीच्या फलंदाजांना बाद करता आलं नाही. पण सिवरने अचूक टप्प्यावर गोलंदाजी करत यूपीच्या सलामीवीर फलंदाजांना मोठे फटके मारू दिले नाही. त्यामुळे पहिल्या षटकात यूपीच्या फक्त २ धावा झाल्या.

https://twitter.com/wplt20/status/1634913573565792257?s=20

19:10 (IST) 12 Mar 2023
मुंबई इंडियन्स विरुद्ध प्रथम फलंदाजी करण्याचा यूपी वॉरियर्सचा निर्णय

यूपी वॉरियर्सची कर्णधार अॅलिसा हिलीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. पिच रिपोर्टनुसार, प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाला खेळपट्टीचा चांगला प्रतिसाद मिळू शकतो. त्यामुळे यूपी वॉरियर्स मुंबई विरुद्ध किती धावांचा डोंगर उभारते, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. पूजा वस्त्राकारला मागील सामन्यात दुखापत झाल्याने आजच्या सामन्यात ती खेळणार नसल्याचे कर्णधार हरमनप्रीत कौरने जाहीर केलं. पूजाच्या जागेवर धारा गुज्जर खेळणार आहे.

https://twitter.com/wplt20/status/1634903095707865088?s=20

18:55 (IST) 12 Mar 2023
WPL च्या गुणतालिकेत कोणता संघ आहे अव्वल स्थानावर?

महिला प्रीमियर लीगमध्ये दिवसेंदिवस रंगतदार सामने पाहायला मिळत असून आज मुंबई इंडियन्स आणि यूपी वॉरियर्स यांच्यात १० वा सामना होत आहे. मुंबईच्या बेब्रॉन स्टेडियमवर या दोन्ही संघामध्ये लढत होत आहे. मुंबईने सलग तीन सामन्यात विजय मिळवून गुणतालिकेत अव्वल स्थान गाठलं आहे. तर यूपी वॉरियर्सने तीन सामन्यांपैकी दोन सामन्यांवर विजय संपादन केल्याने त्यांना ४ गुण मिळाले आहेत. दरम्यान, यूपीचा संघ गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आहे.

18:29 (IST) 12 Mar 2023
'अशी' आहे मुंबई इंडियन्स आणि यूपी वॉरियर्सची संभाव्य प्लेईंग इलेव्हन

मुंबई इंडियन्स संभाव्य प्लेईंग ११ : हेली मॅथ्यूज, यास्तिका भाटिया (यष्टीरक्षक), नॅट सायव्हर-ब्रंट, हरमनप्रीत कौर (कर्णधार), अमेलिया केर, पूजा वस्त्राकर, इस्सी वाँग,अमनजोत कौर, हुमैरा काझी, जिंतीमणी कलिता, सायका इशाक

यूपी वॉरियर्स संभाव्य प्लेईंग ११ : अॅलिसा हिली (कर्णधार आणि यष्टीरक्षक), श्वेता शेरावत, किरण नवगिरे, ताहिला मेग्राथ, दिप्ती शर्मा, ग्रेस हॅरिस, देविका वैद्य, सिमरन शेख, सोफि एक्लेस्टोन, अंजली सरवानी, राजेश्वरी गायकवाड

https://twitter.com/wplt20/status/1634893269720236037?s=20

17:52 (IST) 12 Mar 2023
मुंबई इंडियन्स आणि युपी वॉरियर्समध्ये थोड्याच वेळात रंगणार महामुकाबला

मुंबईच्या बेब्रॉन मैदानात महिला प्रीमियर लीगचा आज १० वा सामना मुंबई इंडियन्स आणि युपी वॉरियर्स यांच्यात रंगणार आहे. मागील तिनही सामन्यांमध्ये मुंबईने विजय संपादन केल्यामुळं त्याचं या पारडं जड आहे. पण यूपी वॉरियर्सनेही मागील सामन्यात जबरदस्त खेळी करून आरसीबीला पराभावाची धूळ चारली. यूपीची कर्णधार अॅलिसा हिली चांगल्या फॉर्ममध्ये आहे. त्यामुळे मुंबईच्या गोलंदाजांपुढं अॅलिसाला बाद करण्याचं आव्हान असणार आहे. तसंच डी वाय पाटील स्टेडियमवर झालेल्या सामन्यात मुंबईने दिल्लीचा आठ गडी राखून पराभव केला होता. त्यामुळं मुंबईचा संघ यूपीचा पराभव करून आज पुन्हा एकदा विजयाची माळ गळ्यात घालणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

https://twitter.com/wplt20/status/1634884857754193920?s=20

WPL 2023 Live Cricket Score, MI-W vs UPW-W Match Updates

मुंबई इंडियन्स महिला विरुद्ध यूपी वॉरियर्स महिला लाइव्ह

Mumbai Indians Women (MI-W) vs Delhi Capital Women (DC-W) Highlights Updates: मुंबई इंडियन्स महिला विरुद्ध यूपी वॉरियर्स महिला लाईव्ह

मुंबई इंडियन्स आणि यूपी वॉरियर्स यांच्यात आज महिला प्रीमियर लीगचा १० वा सामना होत आहे. मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर मुंबई इंडियन्स विरुद्ध यूपी वॉरियर्स यांच्यात लढत होणार आहे.