महिला प्रीमियर लीग (WPL 2023) चा अंतिम सामना आज मुंबईत दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात होणार आहे. या महामुकाबल्यापूर्वी, दिल्लीची कर्णधार मेग लॅनिंगने पत्रकार परिषदेत अनेक विषयांवर चर्चा केली. तिने तिची सहकारी खेळाडू आणि सलामीवीर शफाली वर्माकडे आशा व्यक्त केली आहे की ती या मोठ्या सामन्यात चांगली कामगिरी करेल आणि दिल्लीला सामना जिंकून देईल. मेग लॅनिंगच्या म्हणण्यानुसार, शफाली दिल्ली संघासाठी एक्स-फॅक्टर आहे आणि तिने आतापर्यंत चांगली खेळी केली आहे.

अंतिम सामन्यापूर्वी आयोजित पत्रकार परिषदेत मेग लॅनिंगने शफाली वर्माबद्दल सांगितले, “शफालीसोबत फलंदाजी करताना खूप मजा आली. तिच्याकडे एक अनोखी शैली आहे जी संघासाठी खूप फायद्याची आहे. ती प्रसंगी मोठे फटके मारते आणि आक्रमक फलंदाजी करून निकाल आमच्या बाजूने बदलते. तिने या स्पर्धेत चांगली कामगिरी पार पाडली आणि आज अंतिम फेरीत देखील ती चांगल्या फॉर्ममध्ये दिसत आहे. आशा आहे की ती खुलेपणाने फलंदाजी करेल आणि सामन्यावर वर्चस्व गाजवेल, ज्यासाठी मी तिला दुसऱ्या बाजूला उभे राहून खेळताना पाहू शकते. भारतीय महिला क्रिकेटचे उज्ज्वल भविष्य असे आपण तिला म्हणू शकतो.” असे म्हणत मेग लॅनिंगने शफालीचे कौतुक केले.

Yuzvendra Chahal Becomes First Bowler To Complete 200 Wickets in IPL
IPL 2024: युझवेंद्र चहलने रचला इतिहास, आयपीएलच्या इतिहासात ही कामगिरी करणारा पहिला गोलंदाज
rohit sharma virat kohli
ipl 2024, MI vs RCB: इंडियन प्रीमियर लीग क्रिकेट: सलग दुसऱ्या विजयाचे लक्ष्य! मुंबई इंडियन्ससमोर आज वानखेडेवर रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुचे आव्हान
Rohit sharma speech in Mumbai Indians Dressing Room Video MI vs DC
IPL 2024: ‘वैयक्तिक कामगिरी, विक्रम फारसे महत्त्वाचे नाहीत…’, रोहित शर्माने मुंबईच्या विजयानंतर ड्रेसिंग रूममध्ये खेळाडूंशी साधला संवाद
Today Mumbai Indians vs Delhi Capitals match in Indian Premier League IPL MI VS DC 2024 sport news
Ipl match, DC vs MI: मुंबईला विजयी लय सापडणार? आज घरच्या मैदानावर दिल्ली कॅपिटल्सचे आव्हान; हार्दिक, सूर्यकुमारकडे लक्ष

हेही वाचा: IPL 2023: पंजाब किंग्जला मोठा धक्का, जॉनी बेअरस्टो आयपीएलमधून बाहेर; ‘या’ ऑस्ट्रेलियन खेळाडूचा संघात समावेश

शफाली वर्माने या स्पर्धेत ८ सामन्यात २१४ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याचा स्ट्राईक रेट १८२.५८ आहे आणि त्याने २ अर्धशतकांसह ८४ धावांची सर्वोच्च खेळीही खेळली आहे. मुंबई इंडियन्सविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात वर्माने ३३ धावांची तुफानी इनिंग खेळली होती. महिला प्रीमियर लीगच्या गुणतालिकेत दिल्ली कॅपिटल्सने अव्वल स्थान पटकावले आणि नियमानुसार दिल्ली संघाने थेट अंतिम फेरीत प्रवेश केला, जिथे त्यांचा सामना आता हरमनप्रीतच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्सशी होणार आहे. साखळी टप्प्यातील सामन्यांमध्ये मुंबई आणि दिल्ली दोनदा आमनेसामने आले आहेत, जिथे दोघांनी १-१ असा विजय मिळवला आहे.

दिल्ली कॅपिटल्सने हळूहळू वेग पकडला आणि मुंबईला पॉइंट टेबलमधील अव्वल स्थानावरून दूर केले. लॅनिंग आणि दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू खेळाडू मारिजन कॅप यांनी आतापर्यंत फलंदाजीत कमालीची कामगिरी केली आहे. असे असूनही अंतिम फेरीत दोन्ही संघांपैकी एकालाही विजयाचा प्रबळ दावेदार मानता येत नाही. दोन्ही संघांची कामगिरी पाहता विजेतेपदाचा सामना रंजक होण्याची अपेक्षा आहे.

हेही वाचा: Haris Rauf Video:  पीएसएल ट्रॉफी घेऊन हरिस रौफ पोहोचला वाघा बॉर्डरवर अन् चाहत्यांकडून झाला ट्रोल, Video व्हायरल

दोन्ही संघांचे संभाव्य प्लेईंग-११

दिल्ली कॅपिटल्स: मेग लॅनिंग (कर्णधार), शफाली वर्मा, एलिस कॅप्सी, जेमिमा रॉड्रिग्ज, मारिजन कॅप, तानिया भाटिया (यष्टीरक्षक), जेस जोनासेन, राधा यादव, अरुंधती रेड्डी, शिखा पांडे, पूनम यादव.

मुंबई इंडियन्स: हीली मॅथ्यूज, यास्तिका भाटिया (यष्टीरक्षक), नताली सिव्हर-ब्रंट, हरमनप्रीत कौर (कर्णधार), अमेलिया केर, पूजा वस्त्राकर, इस्सी वाँग, अमनजोत कौर, हुमैरा काझी, जिंतीमणी कलिता, सायका इशाक.