Yashasvi Jaiswal Century IND vs WI 2nd Test: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताचा स्फोटक सलामीवीर फलंदाज यशस्वी जैस्वालने शानदार शतक झळकावलं आहे. यशस्वीने सुरूवातीला संथ सुरूवात केली. पहिल्या सत्रात यशस्वी जैस्वालने राहुलच्या विकेटनंतर सावधपणे संघाचा डाव सावरला. पण यानंतर मात्र दुसऱ्या डावात यशस्वीने सुरूवातीच्या षटकात ३ चौकार लगावत आपलं अर्धशतक पूर्ण केलं. यानंतर त्याने गियर बदलत चौकारांचा पाऊस पाडत वेगाने आपलं शतक पूर्ण केलं.

यशस्वी जैस्वालने १४५ चेंडूत १६ चौकारांसह १०१ धावा करत आपलं सातवं कसोटी शतक पूर्ण केलं. जैस्वालने कसोटी पदार्पणापासून आतापर्यंत एकट्याने ७ कसोटी शतकं केली आहेत. तर इतर सर्व पदार्पणवीरांनी मिळून ६ कसोटी शतकं केली आहेत. याशिवाय अनोख्या यादीत जैस्वालने आपलं स्थान मिळवलं आहे. जैस्वालने शतक केल्यानंतर हार्ट दाखवत आणि फ्लाईंग किस करत शतकाचं सेलिब्रेशन केलं आहे.

भारतीय संघाने दुसऱ्या कसोटीची नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. कसोटी कर्णधारपद स्वीकारल्यानंतर शुबमन गिलने पहिल्यांदाच नाणेफेक जिंकली आहे, यानंतर संपूर्ण संघाने त्याचं कौतुक केलं. राहुल आणि जैस्वालने संथ सुरूवात करत संघाचा डाव हळूहळू पुढे नेला. पहिल्या सत्रात टीम इंडियाने ९४ धावा केल्या. तर दुसऱ्या डावात यशस्वी जैस्वालने धावांचा वेग वाढवत झटपट शतक झळाकवलं. जैस्वालला साई सुदर्शननेही चांगली साथ दिली. या दोघांनी मिळून १०० हून अधिक धावांची भागीदारी रचली आहे.

यशस्वी जैस्वालचं कसोटीतील सातवं शतक आहे. यशस्वी जैस्वालचं वय २३ वर्षे आहे. जैस्वालने २३व्या वर्षात आतापर्यंत ७ शतकं झळकावली आहेत. जैस्वालच्या आधी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने २३व्या वर्षापर्यंत ११ शतकं झळकावली होती.

भारतासाठी कसोटीत शतक झळकावणारे २३ वर्षीय फलंदाज

सचिन तेंडुलकर – ११ शतकं

यशस्वी जैस्वाल- ७ शतकं

रवी शास्त्री – ५ शतकं

दिलीप वेंगसरकर – ५ शतकं