‘बिग बॉस १०’ या रिआलिटी शोमधील स्पर्धक आणि क्रिकेटपटू युवराज सिंगची वहिनी आकांक्षा शर्मा हिने केलेल्या आरोपांवर युवराजच्या आई-वडिलांनी संताप व्यक्त केला आहे. युवराजवर करण्यात आलेले सर्व आरोप खोटे असून तिला(आकांक्षा) त्याचे फळ देखील भोगावे लागले आहे. जनतेने तिला कार्यक्रमातून बाहेर काढून टाकले आहे, अशी प्रतिक्रिया युवराजच्या आई-वडिलांनी दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर आकांक्षाने एक मुलाखत दिली होती. त्यात तिने युवराजला ड्रग्स घेण्याची सवय असल्याचे सांगितले होते. तसेच, युवराजच्या आईने केलेल्या आरोपांविषयी तिला विचारले असता, आरोपांचा विषय येतो तिथे माझ्या कुटुंबालाही सोडण्यात आलेले नाही. मी माझ्या नव-यासह ड्रग्स घ्यायचे. तेव्हा युवराजनेच मला त्यालाही ड्रग्स घेण्याची सवय असल्याचे सांगितले होते.

वाचा: आकांक्षा शर्माने केला युवराज सिंग ड्रग्स घेत असल्याचा आरोप

आकांक्षाचे आरोप खोडून काढत युवराजच्या आईने संताप व्यक्त केला. माझ्या मुलाने देशासाठी रक्त, घाम आणि अश्रू वाहिले आहेत. असे खोटे आरोप करून त्याचा अपमान होत आहे. ती (आकांक्षा) करत असलेले सर्व आरोप खोटे आहेत, असे युवराजची आई म्हणाली. तर युवराजचे वडिल योगराज यांनी युवराज आणि माझी इतर तीन मुलं ही सिंहासारखी आहेत. ते गवत खात नाहीत. युवीवर करण्यात आलेल्या आरोपांमुळे त्याच्या क्रिकेट करिअरवर कोणताही परिणाम होणार नाही. युवराज हा देशासाठी हिरो आहे. त्याचे खूप चाहते आहेत. युवीच्या चाहत्यांनी तिला (आकांक्षा) बिग बॉसमधून बाहेर काढून अद्दल घडवली आहे, असेही योगराज पुढे म्हणाले. आकांक्षाने केलेल्या आरोपांवरून तिच्याविरोधात कोर्टात जाण्याचा निर्णय घेतल्याचेही त्यांनी सांगितले.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Yuvraj singh mom and dad agitated over false allegations against son
First published on: 02-11-2016 at 17:30 IST