Highest T20I Total by Zimbabwe: अद्भुत अशा फटकेबाजीचं प्रदर्शन करत झिम्बाब्वेने गांबिआविरुध्दच्या टी२० लढतीत ३४४ धावांचा पर्वतच उभारला. टी२० प्रकारात कोणत्याही संघाने केलेली ही सर्वोच्च धावसंख्या आहे. टी२० वर्ल्डकपसाठीच्या आफ्रिका सबरिजनल गटाच्या लढतीत झिम्बाब्वेने हा पराक्रम केला. सिकंदर रझाने अवघ्या ३३ चेंडूत शतक साजरं केलं. त्याने १५ षटकारांसह नाबाद १३३ धावांची खेळी केली. सिकंदरच्या १५ सह बाकी फलंदाजांनी मिळून आणखी १२ षटकार चोपले. हाही एक विश्वविक्रम आहे.

हेही वाचा – IND vs NZ : न्यूझीलंडने घेतला फलंदाजीचा निर्णय, भारतीय प्लेइंग इलेव्हनमध्ये तीन मोठे बदल, ‘या’ खेळाडूंना दिला डच्चू

Karun Nair Smashed 88 Runs Against Maharashtra in Semi Final Vijay Hazare Trophy Innings
Karun Nair: करूण नायरचं विजय हजारे ट्रॉफीमधील वादळ कायम, सेमीफायनलमध्ये महाराष्ट्राच्या गोलंदाजांना दिवसा दाखवले तारे
Mahayuti Government
Shiv Sena : महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार,…
Akash Deep has revealed How Virat Kohli gifted his bat that saved Gabba Test for India
Virat Kohli : ‘मी बॅट मागितली नव्हती, त्यानेच…’, गाबा कसोटी वाचवणाऱ्या आकाशदीपचा विराटच्या बॅटबद्दल मोठा खुलासा
India Women Register 435 Highest ODI Total
India Women Highest ODI Total: भारतीय महिला संघाची वनडेच्या इतिहासातील सर्वात मोठी धावसंख्या, पुरूष संघालाही टाकलं मागे
IND vs ENG Aakash Chopra questioned absence of Shivam Dube from India squad for the upcoming T20I series
IND vs ENG : भारताच्या टी-२० संघात CSK च्या खेळाडूला संधी न मिळाल्याने माजी खेळाडू संतापला, उपस्थित केले प्रश्न
IND vs ENG T20I Series Full Schedule Timings and Squads in Detail
IND vs ENG: भारत वि इंग्लंड टी-२० मालिकेचं संपूर्ण वेळापत्रक एकाच क्लिकवर! जाणून घ्या सामन्याची नेमकी वेळ
Kagiso Rabada create history first SA20 2025 Bowler to bowl 2 consecutive maiden overs in the powerplay
SA20 2025 : कगिसो रबाडाने घडवला इतिहास! अश्विन-चहलला मागे टाकत ‘हा’ पराक्रम करणारा जगातील पहिला गोलंदाज
Nitish Reddy climbs Tirupati Temple stairs on knees After Stunning Test Debut & Century vs Australia
Nitish Reddy: नितीश रेड्डी गुडघ्यावर चढला तिरूपतीच्या पायऱ्या, ऑस्ट्रेलियातील शतकानंतर देवाचे असे मानले आभार; VIDEO व्हायरल

झिम्बाब्वेने रचली टी-२० मधील सर्वात मोठी धावसंख्या

या प्रचंड लक्ष्याचा पाठलाग करताना गांबिआचा डाव ५४ धावांतच आटोपला. झिम्बाब्वेने २९० अशा प्रचंड फरकाने विजय मिळवला. नैरोबीतल्या रुराका स्पोर्ट्स क्लब ग्राऊंडवर झालेल्या लढतीत झिम्बाब्वेच्या फलंदाजांनी चौकार, षटकारांची लयलूट केली. तब्बल ५७ चौकार पाहायला मिळाले.

ब्रायन बेनेटने २६ चेंडूत ५०, तादूवानाशे मारामनीने १९ चेंडूत ६२ धावांची खेळी केली. क्लाईव्ह मदांदेने १७ चेंडूत ५३ धावा फटकावल्या. रायन बर्लने ११ चेंडूत २५ धावा केल्या. गांबिआकडून मुसा जोबारटेहच्या ४ षटकात झिम्बाब्वेने ९३ धावा कुटल्या. प्रत्युत्तरादाखल खेळताना गांबिआचा डाव ५४ धावांतच आटोपला. झिम्बाब्वेतर्फे रिचर्ड नकाराग्वा आणि ब्रॅंडन मावुटा यांनी प्रत्येकी ३ विकेट्स पटकावल्या.

हेही वाचा – VIDEO: नवा विश्वविक्रम! न्यूझीलंडच्या खेळाडूने फक्त इतक्या चेंडूत झळकावले सर्वात जलद द्विशतक

गांबियाचा गोलंदाज मोसेस जोबर्टेहने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वात महागडा स्पेल टाकला. त्याने आपल्या चार षटकात एकूण ९३ धावा दिल्या आणि त्याला एकही विकेट मिळाली नाही. अजून ७ धावा जर त्याच्या स्पेलमध्ये झिम्बाब्वेने चोपल्या असत्या तर टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये गोलंदाजाने १०० धावा देण्याची ही पहिलीच वेळ ठरली असती. असे असले तरी मुसा जोबरतेह याचे नाव रेकॉर्ड बुकमध्ये नोंदवण्यात आले आहे.

सिकंदर रझाने अवघ्या ३३ चेंडूत आपले शतक पूर्ण केले होते. अशारितीने तो आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये सर्वात जलद शतक झळकावणारा संयुक्त दुसरा फलंदाज बनला आहे.झिम्बाब्वेने या डावात एकूण २७ षटकार मारले होते, जे टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच घडले आहे.

Story img Loader