New Zealand Batter Chad Bowes World Record: न्यूझीलंडचा फलंदाज चॅड बोवेसने लिस्ट ए क्रिकेटमध्ये नवा जागतिक विक्रम घडवला आहे. न्यूझीलंडमधील देशांतर्गत क्रिकेट स्पर्धा फोर्ड कप स्पर्धेत सर्वात जलद द्विशतक झळकावत त्याने दिग्गज क्रिकेटपटूंचा विक्रम मोडत नवा विक्रम घडवला आहे. न्यूझीलंडमधील देशांतर्गत क्रिकेट स्पर्धा फोर्ड कप टूर्नामेंटमध्ये ओटागो व्होल्ट्स संघाच्या गोलंदाजांची धुलाई करत त्याने लिस्ट ए मधील सर्वात जलद द्विशतक झळकावले. कँटरबरी किंग्जचे प्रतिनिधित्व करताना, या फलंदाजाने व्हॉल्टसविरुद्ध फलंदाजी करताना १०३ चेंडूत शानदार द्विशतक झळकावले.

३२ वर्षीय बोवेसने २७ चौकार आणि सात षटकार लगावले आणि किंग्जला ५० षटकांत ९ बाद ३४३ धावांपर्यंत मजल मारता आली. बोवेसने ऑस्ट्रेलियाचा ट्रॅव्हिस हेड आणि भारतीय यष्टीरक्षक फलंदाज एन जगदीसन यांचा लिस्ट ए क्रिकेटमधील सर्वात वेगवान द्विशतकांचा संयुक्त विक्रम मोडला. या दोन्ही खेळाडूंनी ११३ चेंडूत द्विशतक झळकावले होते. तर बोवेसने ही कामगिरी १०३ चेंडूत नवा विक्रम रचला आहे. अखेरीस तो ११० चेंडूत २०५ धावा करून बाद झाला.

Sitanshu Kotak added as batting coach to India team ahead of England white ball tour
India New Batting Coach: भारतीय संघाला मिळाला नवा फलंदाजी प्रशिक्षक, इंग्लंडविरूद्ध टी-२० मालिकेपूर्वी ताफ्यात होणार सामील
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Akash Deep has revealed How Virat Kohli gifted his bat that saved Gabba Test for India
Virat Kohli : ‘मी बॅट मागितली नव्हती, त्यानेच…’, गाबा कसोटी वाचवणाऱ्या आकाशदीपचा विराटच्या बॅटबद्दल मोठा खुलासा
Kagiso Rabada create history first SA20 2025 Bowler to bowl 2 consecutive maiden overs in the powerplay
SA20 2025 : कगिसो रबाडाने घडवला इतिहास! अश्विन-चहलला मागे टाकत ‘हा’ पराक्रम करणारा जगातील पहिला गोलंदाज
14-year old Ira Jadhav slams 346 in U19 cricket breaks Smriti Mandhanas record against Meghalaya
Ira Jadhav : १५७ चेंडू, ३४६ धावा आणि ४२ चौकार…इरा जाधवने स्मृती मानधनाला मागे टाकत झळकावले विक्रमी त्रिशतक
NZ vs SL Sri Lanka beat New Zealand by 140 runs Mark Chapman 82 runs in 3rd ODI match at Eden Park
NZ vs SL : तिसऱ्या वनडेत श्रीलंकेने उडवला न्यूझीलंडचा धुव्वा, मार्क चॅपमनची खेळी ठरली व्यर्थ
Fan who caught Kane Williamson's sixer with one hand wins Rs 90 lakh prize in SA20 2025 Match
SA20 2025 : मॅच पाहायला गेला आणि लखपती झाला, केन विल्यमसनच्या षटकाराने चाहत्याचं नशीब कसं बदललं?
N Jagadeesan smashed 6 fours off 6 balls against Aman Shekhawat during RAJ vs TN match Vijay Hazare Trophy
N Jagadeesan : ६ चेंडू, ६ चौकार… एन.जगदीशनचा अनोखा विक्रम, VIDEO होतोय व्हायरल

हेही वाचा – Rohit Sharma: रोहित शर्माची स्वाक्षरी घेतल्यावर चाहतीचा विराटसाठी खास संदेश, विनंती ऐकताच कर्णधाराने…, VIDEO मध्ये पाहा काय घडलं?

फोर्ड कप स्पर्धेत दुसऱ्यांदा द्विशतक झळकावलेले पाहायला मिळाले आहे. यापूर्वी २०१२-१३ मध्ये जेमी हाऊने सेंट्रल स्टॅगसाठी २२२ धावा केल्या होत्या. योगायोगाने, बोवेसची मॅरेथॉन खेळी त्याच्या १०० व्या लिस्ट ए सामन्यात पाहायला मिळाली. उजव्या हाताच्या सलामीच्या फलंदाजाने किवी संघासाठी सहा एकदिवसीय सामने आणि ११ टी-२० सामने खेळले आहेत. हे सामने त्याने २०२३ मध्ये खेळले आहेत.

हेही वाचा – IND vs NZ: “त्यांना माहितीय ते कारकिर्दीच्या…”, रोहित शर्माकडून सर्फराझचा उल्लेख करत ट्रोल होणाऱ्या केएल राहुलला अल्टीमेटम

बोवेसने केवळ ५३ चेंडूंमध्ये आपले शतक झळकावले, ज्यामुळे ते स्पर्धेच्या इतिहासातील चेंडूंच्या दृष्टीने पाच जलद शतकांपैकी एक बनले. सर्वात वेगवान शतकाचा विक्रम न्यूझीलंडचा माजी कर्णधार रॉस टेलरच्या नावावर आहे. त्याने २०२१-२२ मध्ये सेंट्रल स्टॅगसाठी ४९ चेंडूत शतक झळकावले.

दक्षिण आफ्रिकेत जन्मलेल्या बोवेसने २०१५ मध्ये न्यूझीलंडला जाण्यापूर्वी प्रोटीज अंडर-१९ संघात आपल्या क्रिकेट कारकिर्दीची सुरुवात केली. २०१२ च्या अंडर-१९ विश्वचषक स्पर्धेत त्याने दक्षिण आफ्रिकेचे नेतृत्व केले आणि त्या स्पर्धेतील सर्वात जास्त धावा करणाऱ्या खेळाडूंपैकी एक होता.

हेही वाचा – Ayush Badoni : खेळाडू आहे की सुपरमॅन! आयुष बदोनीने घेतलेला चित्तथरारक झेल पाहून सर्वच अवाक्, पाहा VIDEO

पुरुषांच्या लिस्ट ए क्रिकेटमधील सर्वात जलद द्विशतक

१०३ चेंडू – चॅड बोवेस वि ओटागो, २०२४
११४ चेंडू – ट्रॅव्हिस हेड विरुद्ध क्वीन्सलँड, २०२१
११४ चेंडू – नारायण जगदीसन वि अरुणाचल प्रदेश, २०२२

Story img Loader