आजही आपण थेराबँडच्या साहाय्याने व्यायाम करणार आहोत. हाताच्या मजबुतीसाठी ‘बायसेप्स मसल’ (बाहूचा स्नायू) बळकट असणे आवश्यक आहे. आज थेराबँडच्या साहाय्याने ‘बायसेप्स मसल’चा व्यायाम करणार आहोत.
कसे कराल?
थेराबँडचे एक टोक पायाखाली धरून ठेवा, तर दुसरे टोक हाताच्या बोटांभोवती गुंडाळा. अशा वेळी तुमचा हात काटकोनात असावा. (छायाचित्र १ पाहा)
आता थेराबँडला थोडा ताण देऊन हात कोपरापासून वर न्या. (छायाचित्र २ पाहा)
असे १० ते २० वेळा करा. काही दिवसांनी संख्या वाढवा. जितक्या जास्त वेळा कराल, तितके बाहूच्या स्नायूचा व्यायाम अधिक होईल.
आधी एका हाताचा व्यायाम करा, त्यानंतर दुसऱ्या हाताचा वापर करून व्यायाम करा.
थेराबँडला अधिक ताण देऊन व्यायाम केल्यास बाहूचे स्नायू अधिक मजबूत होतील.
विशेष म्हणजे या व्यायाम प्रकारात केवळ बाहूचा स्नायूच नव्हे, तर हाताच्या इतर स्नायूंचाही व्यायाम होतो. मनगटाच्या बळकटीसाठीही या व्यायामाचा उपयोग होतो.
dr.abhijit@gmail.com