आज जवळपास प्रत्येक कार्यालयीन कामाचे संगणकीकरण झाले आहे. त्यामुळे संगणकाशी प्रत्येकाचाच संबंध येतो. तसेच कामानिमित्त बाहेर असतानाही संगणकाची गरज लागतेच. अशा वेळी डेस्कटॉपपेक्षा लॅपटॉपअधिक सोयीचा ठरतो.अशा वेळी आपल्या गरजेच्या दृष्टीने योग्य आणि खिशाला परवडेल असा लॅपटॉप घ्यायचा असेल तर लक्षात ठेवायच्या टिप्स.

आकार

AI Artist Imagines Summer In Parallel Universe viral photo
‘हाय गर्मी!’ बर्फाची टोपी, अंगावर एसी; भविष्यात असा असेल का उन्हाळा? ‘या’ AI फोटोची होत आहे तुफान चर्चा
Barfiwala bridge
मुंबई : बर्फीवाला पुलाचा ‘पार्किंग’साठी वापर, क्रिकेट खेळण्यासाठी, कपडे वाळत घालण्यासाठी उपयोग
tiffin box recipe chavli masala in marathi
Lunch box recipe : ‘चवळी मसाला’ सोपी आणि झटपट तयार होणारी रेसिपी; कशी बनवावी पाहा
World idli day 2024 how to make healthy oats idli
World idli day : पौष्टिक अन् झटपट नाश्त्यासाठी बनवा ‘ओट्स’ इडली; पाहा रेसिपी, प्रमाण

तुमच्या कामाचे स्वरूप हे ठिकठिकाणी फिरण्याचे असेल आणि प्रत्येक वेळी तुम्हाला लॅपटॉप सोबत ठेवावा लागत असेल तर नवीन लॅपटॉप खरेदी करताना त्याच्या आकाराचा विचार डोक्यात असू द्या. लॅपटॉप घेऊन सतत प्रवास करावा लागत असेल तर तुम्हाला छोटी स्क्रीन असलेला ‘नोटबुक’ सोयीचा ठरेल. साधारण १२.५ इंच ते १३.३ इंच आकाराची स्क्रीन असलेले लॅपटॉप यासाठी योग्य पर्याय आहेत. त्याशिवाय नोटबुकचे वजनही तुलनेने कमी असणे आवश्यक आहे. अशा वेळी ‘अल्ट्राबुक’ या वर्गात मोडणारे लॅपटॉप उत्तम पर्याय ठरू शकतात. हे ‘अल्ट्राबुक’ वजनाने हलके आणि आकाराने पातळ असतात. तसेच त्यांचे वजनही साधारण दीड किलोग्रॅमइतकेच असते.

स्क्रीनचा दर्जा

तुम्ही लॅपटॉप सातत्याने वापरणार असाल तर, त्याची स्क्रीन ही तुमच्या डोळय़ांना त्रास न करणारी असली पाहिजे. अलीकडे अनेक लॅपटॉपना ‘टचस्क्रीन’ पुरवण्यात आलेली असते. ‘टचस्क्रीन’ असलेला डिस्प्ले हा तुलनेने अधिक भडक असतो. अशी स्क्रीन ही डोळय़ांना त्रासदायक असते. तसेच या स्क्रीनवर प्रतिबिंब दिसण्याचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे तुम्हाला दिवसभरात जास्त वेळ लॅपटॉप वापरावा लागत असेल तर, ‘टचस्क्रीन’ असलेला लॅपटॉप खरेदी करणे टाळा.

दुसरे म्हणजे, लॅपटॉपची निवड करताना स्क्रीनचे रेझोल्युशन नेहमी विचारात घ्या. १९२०७ १०८० पिक्सेल रेझोल्युशन असलेला फुल एचडी असलेला लॅपटॉप तुम्हाला मूव्ही पाहण्यासाठी उपयुक्त ठरतो. तसेच तुम्हाला तुमच्या लॅपटॉपच्या डेस्कटॉपवर जास्तीत जास्त आयकॉनसाठी जागा हवी असेल तर या रेझोल्युशनचा डिस्प्ले उपयुक्त ठरतो.

सीपीयू

कोणत्याही संगणकाचा सीपीयू जितका शक्तिशाली तितकी त्याची कार्यक्षमता अधिक असते. त्यामुळे लॅपटॉपची निवड करतानाही सीपीयू अर्थात प्रोसेसर लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे. सध्या इंटेलचे प्रोसेसर बहुतांश लॅपटॉपमध्ये असतात. त्यातही नवीन लॅपटॉपमध्ये इंटेल कोअर आय ३, आय ५ आणि आय ७ या श्रेणीतील सीपीयू अधिक कार्यक्षम मानले जातात. ‘मल्टिटािस्कग’ तसेच ‘मल्टिमीडिया’ कामांसाठी हे सीपीयू असलेले लॅपटॉप चांगला पर्याय ठरू शकतील. मात्र, इंटेलचे सीपीयू असलेले लॅपटॉप तुलनेने महाग आहेत. अशा वेळी एएमडी किंवा अन्य कंपन्यांचे सीपीयूही उपयुक्त ठरू शकतील. मात्र, त्यांच्या कार्यक्षमतेत मर्यादा आहेत. दुसरं म्हणजे, सीपीयूतून उत्सर्जित होणारी उष्णता लॅपटॉपचे तापमान वाढवते व तो गरम होतो. त्यामुळे सीपीयूचा निकष तपासताना याचीदेखील खबरदारी घ्यायला हवी.

बॅटरी

लॅपटॉपची बॅटरी किती शक्तिमान आहे, यावर तो किती अधिक काळ चालू शकेल, हे ठरते. तुम्हाला चार्जिगशिवाय जास्त काळ लॅपटॉप वापरावा लागत असेल तर जास्त क्षमतेची बॅटरी असलेला लॅपटॉप घेणे उत्तम. पण त्यासोबतच हेही लक्षात ठेवले पाहिजे की, लॅपटॉप हाताळण्याच्या छोटय़ा सवयी बदलून आपण त्याची बॅटरीक्षमता वाढवू शकतो. यामध्ये स्क्रीनचा ब्राइटनेस कमी ठेवणे, रेझोल्युशन कमी निवडणे, मूव्ही किंवा ऑनलाइन व्हिडीओ कमी पाहणे या गोष्टी बॅटरी अधिक काळ टिकवू शकतात.

रॅम

‘रॅम’ हा सीपीयूइतकाच महत्त्वाचा घटक आहे. ‘रॅम’च्या क्षमतेवर तुमच्या लॅपटॉपचा वेग ठरतो. मात्र, जितके जास्त जीबीचे रॅम असतील तितकी लॅपटॉपची किंमत जास्त असते. त्यामुळे ‘रॅम’ची निवड करताना तुम्हाला तुमच्या कामासाठी किती जीबीच्या रॅम पुरेशा आहेत, याची काळजी घ्या. चार जीबी रॅम असलेले लॅपटॉप सर्वसाधारणपणे सर्व कामे कार्यक्षमतेने करू शकतात. मात्र, तुमचे काम ‘मल्टीमीडिया’शी किंवा ‘ग्राफिक्स’शी संबंधित असेल तर तुम्हाला त्यापेक्षा अधिक क्षमतेच्या रॅम असलेला लॅपटॉपच निवडावा लागेल.

कीबोर्ड

लॅपटॉपचा आकार बदलतो तसे त्याच्या कीबोर्डचा आकारही कमी-जास्त होतो. अशा वेळी बहुतेक कंपन्या ‘न्यूमपॅड’ला तिलांजली देतात तसेच ‘फंक्शन’ बटणेही कमी करतात. तुमचा लॅपटॉपचा वापर हा कमी टायपिंगच्या संदर्भात असेल तर ‘न्यूमपॅड’ नसलेला कीबोर्ड तुम्हाला चालू शकतो. मात्र, टायपिंग हा तुमच्या लॅपटॉप वापराचा महत्त्वाचा पैलू असेल तर मात्र, तुम्हाला पूर्ण आकाराचा कीबोर्ड असलेला लॅपटॉपच घ्यावा लागेल. हे करतानाही कीबोर्ड हाताळून पाहा. त्यावरील अक्षरांच्या बटणांत मोकळी जागा आहे का, ती बटणे सर्वसाधारण मांडणीसारखीच आहेत का, याची खातरजमा करूनच निर्णय घ्या.

स्टोअरेज

सध्या १२८ जीबीपासून एक टीबीपर्यंतची स्टोअरेज अर्थात साठवण क्षमता असलेले लॅपटॉप उपलब्ध आहेत. जेवढी अधिक स्टोअरेज तेवढे चांगले. कारण त्यामुळे तुम्हाला भविष्यात लॅपटॉपवरील स्पेसची कमतरता जाणवत नाही. सध्या एसएसडी आणि हार्ड ड्राइव्ह अशा प्रकारात स्टोअरेज पुरवली जाते. ‘एसएसडी’ असलेल्या लॅपटॉपचा वेग जास्त असतो. मात्र, ‘एसएसडी’मध्ये साधारण १२८ जीबी ते २५६ जीबी इतकीच साठवण क्षमता असते. त्यामुळे या लॅपटॉपमध्ये जागेच्या मर्यादा जाणवतात.

गरज आणि बजेट

वरील सर्व निकष लॅपटॉपच्या तंत्रज्ञानाशी संबंधित असले तरी त्यांची निवड करताना आपली गरज आणि बजेट या दोन गोष्टींचा विचार करावाच लागतो. बाजारात लॅपटॉप खरेदी करायला गेल्यानंतर आपल्याला आकर्षक आणि अधिक कार्यक्षम लॅपटॉप दिसतील आणि ते खरेदी करण्याचा मोहदेखील होईल. मात्र, ते आपल्या खिशाला परवडणारे आहेत का, याचा विचार सर्वप्रथम केला पाहिजे. दुसरे म्हणजे, आपल्या कामाचे स्वरूप आणि लॅपटॉपचा सर्वाधिक वापर कशासाठी होणार आहे, याचेही भान बाळगले पाहिजे.