पायाच्या पोटरीच्या स्नायूंना बळकटी मिळवण्यासाठीचा व्यायाम आज आपण करणार आहोत. हा व्यायाम करताना थेराबँडचा वापर करायचा आहे.

कसे कराल?

* पायाच्या दोन्ही टाचांना थेराबँड घट्ट बांधा. त्यानंतर जमिनीवर झोपा. थेराबँडला थोडा ताण देऊन हळूहळू एक पाय वर उचला. लक्षात ठेवा, पाय ४५ अंशांमध्येच वर उचला आणि दहापर्यंत मोजा. त्यानंतर पाय हळूहळू खाली घ्या आणि त्यानंतर दुसरा पाय वर उचला.

*  या व्यायामाने पायाच्या पोटऱ्यांवर ताण येतो आणि त्याचे स्नायू बळकट बनतात. पाय ४५ अंशांपेक्षा अधिक उचलू नका. थेराबँड जर पायाच्या टाचांना घट्ट बांधला नसेल तर तो सुटण्याची शक्यता असते. त्यामुळे याकडेही लक्ष देणे आवश्यक आहे.

dr.abhijit@gmail.com