पर्यावरण वाचविण्यासाठी प्लास्टिकवर बंदी घालण्यात आल्यामुळे आता कागदी पिशव्या आणि पुठ्ठय़ाच्या खोक्यांचा वापर वाढला आहे. या खोक्यांचा पुनर्वापर करता येऊ शकतो. कसा ते आज पाहू या.
साहित्य :
उभा खोका, अॅक्रेलिक रंग, रंगकामाचे साहित्य, कात्री, ग्लिटर, गम, पेन्सिल, पट्टी इत्यादी.
कृती
* कागदी खोक्यावरील वेष्टन काढून टाकावे. किंवा खोका पूर्ण उघडून आतील बाजू बाहेर आणावी.
* पुठ्ठा जिथे दुमडलेला आहे, अशा ठिकाणी शंकरपाळ्यांच्या आकृती काढा.
* मागील बाजूस एका सरळ रेषेत दोन्ही शंकरपाळ्यांच्या आत आडव्या पट्टय़ा पेन्सिलने आखून घ्या.
* सर्व पट्टय़ा शंकरपाळ्यांच्या आकारात कापा व आतील बाजूस ढकला.
* खोक्यावर चित्र काढा व गडद रंगांत रंगवा, बाहेरील समासाची पट्टी चिकटवून खोका पूर्ववत करा.
* वरील बाजू बंद करा.
* खालील बाजू उघडून बल्बवर ठेवा.
* लॅम्पेशडच्या कापलेल्या भागातून सुंदर प्रकाशकिरणे परावर्तीत होऊन भिंतीवर नक्षी तयार होईल.
* खोक्याचा पुनर्वापर तर होईल, कचरा कमी होईल आणि त्यातूनच घरच्या घरी उपयुक्त आणि शोभिवंत वस्तू तयार होईल.
apac64kala@gmail.com