वेफर्स, चिप्सपासून अगदी चण्या-शेंगदाण्यांपर्यंत सगळ काही हल्ली आकर्षक वेष्टनांत आणि बडय़ा ब्रँड्सच्या नावांनी बाजारात विकलं जाऊ लागलं आहे. थोडीशी पोटपूजा करण्यासाठी म्हणून घरात दाखल होणारी ही पॅकेट्स कचऱ्यात बरीच भर घालतात. याच पॅकेट्सचा पुनर्वापर करून कचऱ्याच्या डब्याचा भार थोडा हलका करण्याचा हा प्रयत्न..

साहित्य

वेफर्स-चिप्सची रिकामी पॅकेट्स, कात्री, सेलोटेप

कृती

* रिकामी पॅकेट्स स्वच्छ धुवून घ्या. चित्र आणि मजकूर छापलेली बाजू आत आणि चंदेरी रंगाची बाजू बाहेर ठेवा. साधारण ४ इंच रुंदीच्या पट्टय़ा कापा.

* त्या मधोमध उभ्या बाजूस एकमेकांवर सेलोटेपने जोडा.

* वरील बाजूस मध्यापर्यंत खाचा मारा.

* पेन्सील किवा पेनाच्या साहाय्याने गोल गुंडाळून फुले बनवा, सेलोटेपने जोडा.

* ही चंदेरी फुले तुम्ही टेबलावरची पाण्यातील रांगोळी म्हणून वापरू शकता, भेटवस्तूंना आकर्षक वेष्टनात बंद केल्यावर त्यावर सजावट म्हणून चिकटवू शकता. फुलदाणीतही ठेवता येतील.

apac64kala@gmail.com