- ‘सोलो ट्रॅव्हल’ करतेवेळी तुमच्या दिवसाची सुरुवात लवकर करा. ‘नाइट पार्टीज्’मध्ये रमण्यापेक्षा सकाळी भटकंतीला लवकर सुरुवात केलीत, तर बरेच उत्तम पाहून होऊ शकते आणि ते सुरक्षिततेच्या दृष्टीनेही उपयोगी ठरते.
- सोलो ट्रॅव्हल करतेवेळी बुजरेपणा सोडून द्या. आपणहून स्थानिकांशी बोला, त्यांच्याकडून त्या त्या जागेबद्दल, प्रथा परंपरांबद्दल अधिक जाणून घ्या.
- सोलो ट्रॅव्हलचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे तुम्ही तुमच्या मनमर्जीप्रमाणे भटकंती करू शकता. तुम्ही कलेचे चाहते असाल तर एक संपूर्ण दिवस तुम्ही म्युझियममध्ये घालवू शकता किंवा पायी शहर भटकंती करू शकता.
- सोलो ट्रॅव्हल करतेवेळी चेहऱ्यावर कुठल्याही प्रकारचे गोंधळलेले भाव नसावेत. जरी तुम्हाला कुठलीही अडचण आली तरी हसतमुख चेहऱ्याने आणि पूर्ण आत्मविश्वासाने तुम्ही स्थानिक दुकानदारांशी बोलून अधिक माहिती घ्यावी.
- खूप सारी ज्वेलरी वा इतर आकर्षक भडक रंगाचे कपडे, महागडे इलेट्रॉनिक गॅजेट्स, कॅमेऱ्याचा शो-ऑफ टाळावा. थोडक्यात तेथील स्थानिकांप्रमाणे तुम्ही राहण्याचा आणि दिसण्याचा प्रयत्न करा.
- सोलो ट्रॅव्हल करताना एक अत्यावश्यक आणि उपयोगी गोष्ट म्हणजे जिथे जाणार असाल तेथील जुजबी शब्द शिकून घ्या. खरेदी करतेवेळी, मदत मागतेवेळी तुम्हाला याचा उपयोग होऊ शकेल. क्रमश:
संग्रहित लेख, दिनांक 1st Jun 2018 रोजी प्रकाशित
सांगे वाटाडय़ा : भटकंतीत बुजरेपणा सोडून द्या
‘नाइट पार्टीज्’मध्ये रमण्यापेक्षा सकाळी भटकंतीला लवकर सुरुवात केलीत, तर बरेच उत्तम पाहून होऊ शकते आणि ते सुरक्षिततेच्या दृष्टीनेही उपयोगी ठरते.
Written by स्मृती आंबेरकर

First published on: 01-06-2018 at 00:18 IST
मराठीतील सर्व कुटुंबकट्टा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Solo travel tips