महाराष्ट्रात आदिवासी भागांत जशा वारली चित्रांनी भिंती सजवल्या जातात, त्याच प्रकारे राजस्थानात मांडला चित्रांनी घराची सजावट केली जाते. आरसे आणि दोरे वापरून नक्षीकाम केले जाते. घरातल्या काही टाकावू वस्तू वापरून आपण मांडला चित्र तयार करू शकतो. हे चित्र कसे तयार करावे हे जाणून घेऊ या..

साहित्य –

आइसक्रीमच्या काडय़ा, नाडी बंडल, कार्ड पेपर, कात्री, गम, रंग, टिकल्या, पिस्त्यांची टरफले, रंगकामाचे साहित्य.

कृती

  • साधारण चौकोनी कार्ड पेपरच्या मध्यावर गोलाकारात नाडी चिकटवा.
  • आजू बाजूला आईसक्रीमच्या मोठय़ा काडय़ा चिकटवा.
  • दोन मोठय़ा काडय़ा कापून चार तुकडे बनवा.
  • मोठय़ा कडय़ांच्या मध्ये छोटय़ा काडय़ा चिकटवा.
  • छोटय़ा काडय़ांच्या टोकावर पुन्हा गोलाकारात नाडी चिकटवा.
  • रंगाने फुले बनवा.
  • पिस्त्यांची टरफले चिकटवून पाने बनवा.
  • अधेमध्ये टिकल्या चिकटवा.
  • संपूर्ण चौकोनास दोन बाजूस किनार तयार करा.
  • आपले रंगीत मांडला चित्र टेबल किवा भिंतीवर लावून सजावट करता येईल.

apac64kala@gmail.com