News Flash

नवीन Mahindra Bolero पिकअप लाँच, किंमत 7.26 लाख रुपये

अनेक आरामदायक फीचर्स आणि वजन वाहण्याची क्षमता तब्बल...

महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीने भारतीय ऑटोमोबाइल क्षेत्रामध्ये बोलेरो पिकअपचं नवीन व्हर्जन लाँच केलं आहे. नव्या ‘2019 महिंद्रा बोलेरो कँपर रेंज’ला अनेक नवनवीन अपग्रेड्ससह बाजारात उतरवण्यात आलं आहे. यामध्ये डबल केबिन पिकअप असून गोल्ड VX, 4WD, नॉन-AC, कॅश व्हॅन आणि गोल्ड ZX अशा पाच व्हेरिअंटमध्ये ही गाडी उपलब्ध असणार आहे. महिंद्रा बोलेरो गोल्ड ZX ची वजन वाहण्याची क्षमता 1 हजार किलोग्राम इतकी असेल. अनेक आरामदायक फीचर्स यामध्ये असल्याचा दावा कंपनीने केला आहे. महिंद्राने ‘2019 बोलेरो कँपर रेंज’ची एक्स-शोरुम किंमत 7.26 लाख रुपये ठेवली आहे. यातील टॉप मॉडलची किंमत 7.90 लाख रुपये(एक्स-शोरुम) असेल.

2019 महिंद्रा बोलेरो कँपर पिकअपला नवं लूक देण्याचा प्रयत्न कंपनीने केला आहे. पुढील भागातील ग्रिल बदलण्यात आले आहेत, नवीन रिफ्लेक्टर हेडलँप्स आणि बॉडी ग्राफिक्स आहेत. गाडीच्या केबिनमध्येही काही बदल करण्यात आले असून ड्युअल-टोन कलर, फॉक्स लेदर सीट, HVAC सिस्टिम, पावर विंडोज, सेंट्रल लॉकिंग, पावर स्टिअरिंग आणि स्ट्रेचेबल सीटबेल्ट हे फीचर्स आहेत. हे बदल करण्यात आले असले तरी गाडीचं डिझाइन बदलण्यात आलेलं नाही.

महिंद्राने बोलेरो कँपरमध्ये 2523cc क्षमतेचं M2DiCR इंजिन आहे. हे इंजिन 62 bhp ऊर्जा आणि 195 Nm पीक टॉर्क निर्माण करतं. उल्लेखनीय म्हणजे 1 एप्रिल 2020 पासून देशात ‘भारत स्टेज ६’ (बीएस ६) मानके लागू होत असतानाही या गाडीत बीएस-4 इंजिन देण्यात आले आहेत. 15.1 किमी/ प्रतिलीटर इतका या गाडीचा मायलेज आहे असा दावा कंपनीने केला आहे. कंपनीच्या देशभरातील 3 हजारांपेक्षा अधिक टच पॉइंट्सद्वारे ग्राहकांना एका वर्षासाठी चोवीस तास रोडसाइड असिस्टंसची सेवा पुरवली जाईल. या गाडीसोबत कंपनीकडून 3 वर्षांची वॉरंटी (1 लाख किमी प्रवास) देखील मिळेल. भारतीय बाजारात नव्या बोलेरोची tata xenon शी स्पर्धा असण्याची शक्यता आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 24, 2019 3:45 pm

Web Title: 2019 mahindra bolero camper range pickup launched know price and all specifications sas 89
Next Stories
1 Kia Motors चं भारतात पदार्पण, शानदार Seltos एसयूव्ही केली सादर
2 वाट पाहण्याची गरज नाही, Galaxy M40 आता ‘ओपन सेल’मध्ये
3 ‘शाओमी’चा पावरफुल स्मार्टफोन Poco F1 झाला स्वस्त, काय आहे नवी किंमत?
Just Now!
X