जपानची कार कंपनी निसान लवकरच भारतीय बाजारात नवी ‘2019 निसान किक्स कॉम्पॅक्ट SUV’ लाँच करण्याच्या तयारीत आहे. 22 जानेवारी 2019 रोजी ही कार कंपनी लाँच करणार आहे. डिसेंबर 2018 पासून 25 हजार रुपयांत या कारसाठी नोंदणी सुरू असून निसानच्या डिलर्सकडून अथवा संकेतस्थळावरुन निसान किक्सची बुकिंग करता येईल.

सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात असलेल्या मॉडलपेक्षा भारतात लाँच होणारं मॉडल जरा वेगळं असणार आहे. या कारची लांबी 4,384mm, रुंदी 1,813mm आणि उंची 1,656mm याशिवाय व्हिलबेस 2,673mm असेल. क्रिक्समध्ये रेनॉ कॅप्चर इंजिन देण्यात आलं आहे. यामध्ये 1.5 लिटरचं डिझेल इंजिन आहे. 6-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स असलेल्या या इंजिनद्वारे 110hp पावर आणि 240Nm टॉर्क जनरेट होतं.
याशिवाय या कारमध्ये 1.5 लिटर पेट्रोल इंजिनचाही पर्याय आहे. 5-स्पीड मॅन्युअल ट्रांसमिशन असलेलं हे इंजिन 106hp पावर आणि 142Nm टॉर्क जनरेट करतं. कालांतराने ऑटोमॅटिक गिअरबॉक्सचा पर्याय उपलब्ध होईल.

इंटीरिअर –
अनेक असे फिचर्स आहेत जे या सेगमेंटमध्ये प्रथमच देण्यात आलेत. यामध्ये 8-इंच टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टिम असून ही सिस्टिम 360-डिग्री कॅमेरा डिस्प्लेच्या रुपातही काम करते. डॅशबोर्डवर लेदर इंसर्ट्स देण्यात आले असून एलईडी हेडलॅम्प्स, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, क्रूज कंट्रोल, ऑटोमॅटिक वायपर्स आणि 17-इंच अॅलॉय व्हिल्स यांसारखे फिचर्स आहेत.

टक्कर आणि किंमत-
निसान किक्सची बाजारात मारुती सुझुकी व्ही-क्रॉस, रेनॉ कॅप्चर आणि ह्युंडई क्रेटा यांसारख्या दमदार एसयुव्हींशी टक्कर असेल. 9.5 लाख ते 15 लाख रुपयांदरम्यान या कारची किंमत असू शकते.