News Flash

लॉकडाउनमध्ये Airtel चं ‘गिफ्ट’! ‘फ्री’मध्ये बघा अनलिमिटेड सिनेमे आणि टीव्ही शो

लॉकडाउनमध्ये Airtel च्या ग्राहकांसाठी गुड न्यूज...

टेलिकॉम कंपनी भारती एअरटेलने Zee5 सोबतच्या भागीदारीअंतर्गत आपल्या ग्राहकांसाठी एक भन्नाट ऑफर आणली आहे. लॉकडाउनमध्ये व्हिडिओ स्ट्रीमिंगची वाढती मागणी पाहून एअरटेल आपल्या ग्राहकांना Zee5 चं प्रीमियम सब्सक्रिप्शन मोफत देत आहे. त्यामुळे आता Zee5 वरील जवळपास 4,500 पेक्षा जास्त सिनेमे आणि टीव्ही शो एअरटेलच्या ग्राहकांना अगदी मोफत बघता येणार आहेत.

एअरटेलने Zee5 सोबतच्या भागीदारी अंतर्गत ‘समर बोनांझा ऑफर’आणली आहे. ही ऑफर म्हणजे लॉकडाउनमुळे घरी बसून कंटाळलेल्या युजर्ससाठी गिफ्ट ठरणार आहे. कारण त्यांना आता Zee5 वरील जवळपास 4,500 पेक्षा जास्त सिनेमे आणि टीव्ही शो मोफत बघता येणार आहेत. एअरटेलच्या ग्राहकांना ही मोफत सुविधा 4 मे 2020 ते 12 जुलै 2020 पर्यंत मिळेल. एअरटेलचे ग्राहक एअरटेल थँक्स अ‍ॅपमध्ये जाऊन Zee5 चे प्रीमियम सब्सक्रिप्शन अ‍ॅक्टिवेट करु शकतात. 149 किंवा त्यापेक्षा अधिकचं रिचार्ज केलेल्या एअरटेल थँक्सच्या प्रत्येक ग्राहकाला ही सेवा मिळेल. ही ऑफर एअरटेल ब्रॉडबँड आणि पोस्टपेड ग्राहकांसाठीही लागू असेल.

Airtel च्या वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार, एअरटेल प्रीपेड ग्राहक 149 रुपये किंवा त्यापेक्षा जास्त किंमतीच्या अनलिमिटेड रीचार्जवर Zee5 मेंबरशीपचा लाभ घेवू शकतात. अशाचप्रकारे एअरटेल पोस्टपेड आणि ब्रॉडबँड ग्राहकांनाही मोफत सेवा उपलब्ध असेल. ही स्पेशल ऑफर 12 जुलैपर्यंत Airtel Thanks अ‍ॅपद्वारे उपलब्ध असले. एकदा एअरटेल थँक्स अॅपद्वारे ऑफर क्लेम केल्यानंतर तुम्हाला OTT कंटेंट अ‍ॅक्सेस करण्यासाठी Zee5 अ‍ॅप इंस्टॉल करावं लागेल. ऑफर संपल्यानंतर Zee5 सेवा खरेदी करण्याचा पर्याय ग्राहकांना मिळेल. यापूर्वी 2018 मध्ये एअरटेलने प्लॅटिनम ग्राहकांसाठी फ्री Zee5 प्रीमियम सबस्क्रिप्शन दिले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 6, 2020 3:17 pm

Web Title: airtel expands partnership with zee5 summer bonanza offer free access to zee5 sas 89
Next Stories
1 WhatsApp द्वारे ऑर्डर करा स्मार्टफोन, शाओमीची Mi Commerce सेवा लॉन्च
2 Forbes Billionaires list 2020: अब्जाधीशांमध्ये मुकेश अंबानी अव्वलस्थानी कायम, पहिल्यांदाच ‘या’ तरुणाचीही लागली वर्णी
3 प्रतीक्षा संपणार! अखेर WhatsApp ची ‘ही’ सर्व्हिस होणार लॉन्च
Just Now!
X