टेलिकॉम कंपनी एअरटेलच्या 298 रुपयांच्या प्रिपेड रिचार्जवर शानदार ऑफर आहे. या ऑफरनुसार युजर्सना रिचार्ज करताना 50 रुपये डिस्काउंट मिळेल. याशिवाय युजर्सना 2GB अतिरिक्त डेटाही वापरण्यास मिळेल. सविस्तर जाणून घेऊया या ऑफरबाबत :

काय आहे ऑफर :-
एअरटेलच्या २९८ रुपयांच्या प्रिपेड रिचार्जवर कंपनीकडून 50 रुपये डिस्काउंटची ऑफर आहे. पण यासाठी तुम्हाला कंपनीच्या Airtel Thanks app द्वारे रिचार्ज करावं लागेल. Airtel Thanks app मध्ये 298 आणि 398 रुपयांच्या अनलिमिटेड प्रिपेड प्लॅनवर डिस्काउंट कुपन दिले जात आहे. रिचार्ज करताना या डिस्काउंट कुपनचा वापर केल्यास 298 रुपयांच्या रिचार्जवर 50 रुपये सवलत मिळते. म्हणजेच 298 रुपयांच्या रिचार्ससाठी तुम्हाला 248 रुपयेच मोजावे लागतील. याशिवाय २ जीबी अतिरिक्त डेटाही मिळतो. हे डिस्काउंट कुपन मर्यादित संख्येत उपलब्ध आहेत.

आणखी वाचा- नवीन अटी स्वीकारा, नाहीतर अकाउंट Delete करा; WhatsApp ने अपडेट केली प्रायव्हसी पॉलिसी

एअरटेल 298 रुपयांचा प्लॅन :
28 दिवसांची वैधता असलेल्या एअरटेलच्या या प्लॅनमध्ये युजर्सना दररोज 2GB डेटा मिळतो. याशिवाय दररोज 100 एसएमएस आणि एअरटेल XStream व विंक म्यूझिकचं फ्री सबस्क्रिप्शनही मिळतं. तसेच Fastag वर 150 रुपये कॅशबॅकची ऑफरही आहे.