News Flash

बहुप्रतिक्षित iphone 11 च्या प्री-बुकिंगला आजपासून सुरूवात

ई-कॉमर्स संकेतस्थळांनी अधिकृत टिझर पेज लाइव्ह केल्यामुळे झाला खुलासा

Apple ची नवीन आयफोनमधील बहुप्रतिक्षित iphone 11 मालिका अखेर गेल्या आठवड्यात लाँच झाली. यामध्ये कंपनीने iphone 11, iphone 11 Pro आणि iphone 11 Pro Max हे फोन लाँच केले. या तिन्ही आयफोनची भारतात 27 सप्टेंबरपासून विक्री सुरू होईल हे आधीच जाहीर करण्यात आलं होतं, पण यासाठी आगाऊ नोंदणीची कधीपासून सुरूवात होणार याबाबत संभ्रम होता. मात्र, ई-कॉमर्स संकेतस्थळ अॅमेझॉन आणि फ्लिपकार्टने प्री-ऑर्डरसाठी अधिकृत टिझर पेज लाइव्ह केल्यामुळे याबाबत खुलासा झाला आहे.

iphone 11, iphone 11 Pro आणि iphone 11 Pro Max या तीन नव्या आयफोनसाठी आजपासून म्हणजेच 20 सप्टेंबरपासून सुरूवात होत आहे. फ्लिपकार्ट आणि अॅमेझॉनच्या टिझरमध्ये आयफोन 11 आणि आयफोन 11 प्रोचा उल्लेख करण्यात आला आहे. तुलनेने मॅक्स व्हेरिअंटचं तितकं प्रमोशन करण्यात आलेलं नाही. पण, iphone 11 Pro Max साठी देखील 20 तारखेपासूनच प्री-बुकिंग सुरू होईल. याशिवाय पेटीएम मॉलवरही या तिन्ही आयफोनची विक्री होईल, मात्र तिथे अद्याप प्री-बुकिंगबाबत माहिती देण्यात आलेली नाही. यात उल्लेखनीय बाब म्हणजे अॅमेझॉनचे टिझर्स केवळ अॅपवर उपलब्ध आहेत, संकेतस्थळावर नाहीत.

किंमत : भारतात iphone 11 च्या बेसीक व्हेरिअंटची किंमत 64,900 रूपये, iphone 11 Pro च्या बेसीक व्हेरिअंटची किंमत 99,900 रूपये आणि iphone 11 Pro Max च्या बेलीक व्हेरिअंटची किंमत 1,09,900 रूपये असणार आहे.

iphone 11 चे फीचर्स
iphone 11 मध्ये 6.1 इंचाचा LCD रेटिना डिस्प्ले देण्यात आला आहे. यापूर्वी लाँच करण्यात आलेल्या iphone XR प्रमाणेच हा फोन असेल. या फोनमध्ये एक नॉचही देण्यात आली आहे. सहा कलर ऑप्शनसह हा फोन बाजारात विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे. यामध्ये पर्पल, व्हाईट, ग्रीन, रेड, ब्लॅक आणि येल्लो कलर्स उपलब्ध असतील. यामध्ये 12 मेगापिक्सेलचे दोन कॅमेरे देण्यात आले असून मेन कॅमेरा वाईड अँगल लेन्स तर दुसरा कॅमेरा अल्ट्रा वाईड अँगल लेन्स असेल. यामध्येही नाईट मोड फीचर देण्यात आले आहे. यात नाईट मोड आपणहून सुरू होत असल्याचा दावा कंपनीने केला आहे. तसंच 64 fps ने याद्वारे 4K व्हिडीओ रेकॉर्डिंग करता येणार आहे. iphone 11 मध्येही नवी A13 Bionic चीप देण्यात आली आहे.

iphone 11 Pro आणि iphone 11 Max चे फीचर्स
iphone 11 मध्ये ड्युअल कॅमेरा सेटअप देण्यात आले आहे. तर iphone 11 Pro आणि iphone 11 Pro Max या दोन्ही मॉडेल्समध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आले आहे. याव्यतिरिक्त कंपनीने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही नवी Apple A13 Bionic ही चीप लाँच केली आहे. iphone 11 Pro मध्ये 5.8 इंचाचा OLED डिस्प्ले देण्यात आला आहे. तर iphone 11 Pro Max मध्ये 6.5 इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे. तसंच या सर्व फोनमध्ये A13 Bionic प्रोसेसर देण्यात आला आहे. आतापर्यंतच्या स्मार्टफोनमधील ही सर्वात वेगवान प्रोसेसर असल्याचा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे.

कसा आहे कॅमेरा?
iphone 11 Pro मध्ये कंपनीने डीप फ्युजन कॅमेरा फीचर दिले आहे. याचा वापर लो लाईट फोटोग्राफीसाठी करता येणार आहे. यापूर्वी गुगलने आपल्या फोनमध्ये दिलेल्या नाईट साईट फीचर प्रमाणेच हे फीचर काम करणार आहे. एकावेळी 9 फोटो क्लिक करून मर्ज करण्याचे काम हे फीचर करते. iphone 11 Pro 60fps ने 4K व्हिडीओ शूट करू शकतो. यामध्ये मेन कॅमेरा F 1.8 लेन्ससह 12 मेगापिक्सेलचा देण्यात आला आहे. तर दुसरा कॅमेरा F 2.4 लेन्सह अल्ट्रा वाईड आणि तिसरा 12 मेगापिक्सेलचा F 2.0 लेन्ससह झूम लेन्स कॅमेरा देण्यात आला आहे. याव्यतिरिक्त iphone 11 Pro मध्ये 4x ऑप्टिकल झूमदेखील देण्यात आले आहे.

आणखी वाचा :Nokia 7.2 भारतात लाँच , 48MP क्षमतेचा कंपनीचा पहिलाच फोन; किंमत…

कशी आहे बॅटरी ?
Apple ने नव्या iPhone मध्ये बॅटरी लाईफ अधिक उत्तम केली आहे. iphone 11 Pro मध्ये iphone 11 XS च्या तुलनेत 4 तास अधिक बॅटरी बॅकअप मिळणार आहे. iphone 11 Pro Max मध्ये iphone XS Max च्या तुलनेत पाच तास अधिक बॅटरी बॅकअप मिळणार आहे. हे दोन्ही फोन मिडनाईट ग्रीन, स्पेस ग्रे, सिल्व्हर/व्हाईट आणि गोल्ड कलरमध्ये मिळणार आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 20, 2019 9:55 am

Web Title: apple iphone 11 series pre order starts know price specifications offers sas 89
Next Stories
1 Amazon Great Indian Festival ची झाली घोषणा, काय असणार ऑफर्स?
2 कशी आहे Renault ची नवीन Triber?
3 Nokia 7.2 भारतात लाँच , 48MP क्षमतेचा कंपनीचा पहिलाच फोन; किंमत…
Just Now!
X