14 December 2017

News Flash

मोठी सूट ! ३१ मार्चपर्यंत १९,९९९ रुपयांमध्ये मिळणार अॅपल एसई

अॅपलच्या खरेदीवर ५,००० रुपयांची कॅशबॅक ऑफर

नवी दिल्ली | Updated: March 20, 2017 2:52 PM

अॅपलच्या किमतीमध्ये मोठी सवलत मिळणार असून आयफोन एसई १६ जीबी फोन १९,९९९ रुपयांना मिळणार आहे. तर ६४ जीबीच्या मॉडलची किंमत २५,९९९ रुपये असणार आहे. क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्डने जर तुम्ही हा फोन खरेदी केला तर पाच हजार रुपयांची कॅशबॅक ऑफर लवकरच मिळणार आहे असे वृत्त केरळच्या वितरकाने दिले आहे. तसेच या वृत्ताला गॅजेट ३६० ने दुजोरा दिला आहे. सध्या फ्लिपकार्ट आणि इन्फिबीमवर ही ऑफर उपलब्ध नाही, परंतु वितरकाकडे गेल्यावर तुम्हाला ही ऑफर मिळू शकते. शुक्रवारपासून या ऑफरला सुरुवात झाली असून ३१ मार्च पर्यंत ही ऑफर सुरू राहील. अॅक्सिस बॅंक, सिटीबॅंक, एचडीएफसी बॅंक, एसबीसी बॅंक, कोटक बॅंक, आयसीआयसीआय बॅंक, स्टॅंडर्ड चार्टर्ड बॅंक आणि युबीआय बॅंकेच्या क्रेडिट किंवा डेबिट कार्डावर ही ऑफर उपलब्ध आहे. अमेरिकन एक्सप्रेसच्या डेबिट कार्डवर ही ऑफर उपलब्ध नाही.

अॅपलने याबाबत अधिकृत घोषणा केली नाही परंतु अॅपलच्या खरेदीवर वितरकांकडून मोठी सूट उपलब्ध आहे. किंमत केल्यावर या व्हेरियंटच्या फोनच्या विक्रीत वाढ होईल असा विचार करुन वितरकांनी हा निर्णय घेतला आहे. तसेच २०,००० च्या खाली किंमत आल्यानंतर अनेक ग्राहकांना अॅपलचा फोन घेण्याची आपली हौस भागवता येईल असा विचार करुन ही ऑफर देण्यात आली आहे. अॅपलच्या ४.७ इंची व्हेरियंटपेक्षा ४ इंची फोनला जास्त मागणी असल्याचे दिसले आहे.  आयफोन ५ एसचे अद्ययावत वर्जन म्हणजे आयफोन एसई आहे. १२ मेगापिक्सल कॅमेरा, ए ९ प्रोसेसर, १.२ मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा ही या फोनची वैशिष्ट्ये आहेत. २०,००० च्या रेंजमध्ये अॅपलपेक्षाही जास्त अद्ययावत फोन भारतात उपलब्ध झाल्यामुळे अॅपल एस ई सारख्या फोनकडे ग्राहकांनी पाठ फिरवली होती. अॅपलचे अद्ययावत फोन उपलब्ध असल्यामुळे तुलनेनी जुन्या फोनकडे ग्राहकांचा ओढा कमी झाला होता. ग्राहकांना पुन्हा आकर्षित करण्यासाठी ही योजना आणली गेली आहे.

First Published on March 20, 2017 2:52 pm

Web Title: apple iphone se discount cashback offer how to avail