आयफोन X iPhone X च्या खरेदीसाठी आता भारतीय अॅपलप्रेमींना फार काळ वाट पाहावी लागणार नाही. येत्या २७ तारखेपासून अॅपल फोनच्या प्री- बुकिंगला सुरूवात होणार आहे. तर ३ नोव्हेंबरपासून हा फोन भारतीय बाजारपेठेत विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे.

भारतीय वेळेनुसार शुक्रवारी दुपारी १२.३० वाजल्यापासून आयफोनसाठी प्री- बुकिंग सुरू होईल. apple.com आणि Apple Store app वरून या फोनसाठी बुकिंग करता येणार आहे. त्याचप्रमाणे फ्लिपकार्ट, अॅमेझॉनसारख्या ई-कॉमर्ससाईटवरूनही ग्राहकांना हा फोन बुक करता येणार आहे. पुढील महिन्यात ३ नोव्हेंबरपासून अॅपलच्या रिटेल स्टोअरमधून ग्राहकांना तो खरेदी करता येणार आहे. सप्टेंबर महिन्यात अॅपलने आयफोन X लाँच केला होता. ५.८ इंचांच्या बेझललेस डिस्प्लेमुळे आयफोन एक्सला अतिशय शानदार लूक मिळाला. या फोनच्या स्क्रीनचे रिझोल्युशन ११२५ x २४३६ पिक्सल इतके आहे. याआधी आयफोनच्या कोणत्याही मॉडेलमध्ये अशा प्रकारचा डिस्प्ले देण्यात आलेला नाही. याशिवाय आयफोनची ओळख असणारे होम बटणदेखील या फोनला देण्यात आलेले नाही. दहा वर्षांमध्ये प्रथमच होम बटण नसलेला हा फोन आहे.

जाणून घ्या ‘आयफोन X’ मुळे कशी होते सॅमसंगची चांदी

आयफोन एक्समध्ये १२ मेगापिक्सलचे दोन रिअर कॅमेरे देण्यात आले आहेत. यातील एका कॅमेऱ्याला एफ / १.८ अॅपर्चर देण्यात आला असून, दुसऱ्या कॅमेऱ्यात टेलिफोटो लेन्स असेल. एफ/२.४ अॅपर्चर हे या लेन्सचे वैशिष्ट्य असेल. या फोनचा सेल्फी कॅमेरा ७ मेगापिक्सलचा आहे. फेस आईडी फीचरमुळे हा फोन सगळ्यात हटके ठरला. या फीचरमुळे चेहऱ्याचा पासवर्डसारखा वापर करून युजरना फोन अनलॉक करता येणार आहे. या फोनच्या ६४ जीबीच्या मॉडेलची किंमत ८९ हजार रुपये आहे. तर २५६ जीबीच्या मॉडेलसाठी १ लाख २ हजार रुपये मोजावे लागणार आहेत. सध्या सिल्व्हर आणि स्पेस ग्रे अशा दोन रंगात हा फोन भारतात उपलब्ध असेल. अमेरिकेच्या तुलनेत भारतात आयफोन हा ३९ पटींनी महाग आहे.

मायक्रोमॅक्स आणि व्होडाफोनचा भारत २ अल्ट्रा स्मार्टफोन लाँच