Apple ने बुधवारी आपला बहुप्रतिक्षित iPhone SE 2 लाँच केला. आयफोनने लाँच केलेल्या आयफोन्सपैकी हा सर्वात स्वस्त आयफोन असल्याचा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे. सुरूवातीला हा फोन iPhone SE 2 या नावानं लाँच केला जाऊ शकतो अशा चर्चा होत्या. त्यानंतर हा मोबाईल iPhone 9 म्हणून लाँच केला जाईल अशा चर्चा रंगल्या होत्या. या फोनमध्ये iPhone 8 आणि त्यापूर्वीच्या मॉडेल्सप्रमाणेच ४.७ इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे. तसंच यामध्ये Apple ची अत्याधुनिक Apple A13 Bionic chip ही देण्यात आली आहे. सध्या आयफोन ११ सिरिजमध्ये या चिपचा वापर करण्यात आला आहे.


काय आहे किंमत ?

iPhone SE 2020 हा सर्वात स्वस्त iPhone असल्याचा दावा कंपनीनं केला असला तरी त्याची सुरूवातीची किंमत ६४ जीबीच्या व्हेरिअंटसाठी ४२ हजार ५०० रूपये आहे. कंपनीनं हा फोन ६४ जीबी, १२८ जीबी आणि २५६ जीबी स्टोरेजमध्ये उपलब्ध केला आहे. सध्या अन्य व्हेरिअंटच्या भारतातील किंमतीबाबत मात्र कंपनीनं कोणतीही माहिती दिलेली नाही. तसंच हा फोन ब्लॅक, व्हाईट आणि (प्रोडक्ट) रेड या रंगांच्या पर्यायत उपलब्ध असेल.


स्पेसिफिकेशन्स
iPhone SE 2020 मध्ये ४.७ इंचाचा रॅटिना HD IPS LCD डिस्प्ले देण्यात आला आगे. तसंच यामध्ये आयफोनच्या अत्याधुनिक A13 Bionic chip चा वापर करण्यात आला आहे. यापूर्वी या चीपचा वापर iPhone 11, iPhone 11 Pro आणि iPhone 11 Pro Max या फोनमध्ये करण्यात आला होता. याव्यतिरिक्त या मोबाईलमध्ये डॉल्बी व्हिजन आणि HDR10 चा सपोर्ट देण्यात आला आहे. कनेक्टिव्हिटी पाहिली तर यात 4G VoLTE, वायफाय 802.11ax, वायफाय कॉलिंग, NFC, ब्लूटूथ v5.0, GPS/ A-GPS देण्यात आलं आहे. तसंच यामध्ये टच आयडी बटनही देण्यात आलं आहे.

फोटो सौजन्य – आयफोन इंडिया

iPhone SE 2020 चा लुक iPhone 8 प्रमाणेच आहे. तसंच हा फोन IP67 रेटिंगसह येतो. त्यामुळे हा फोन डस्ट आणि वॉटर रेझिस्टंटदेखील आहे. १ मीटर खोल पाण्यात हा फोन अर्ध्या तासापर्यंत राहू शकतो. फोनची संपूर्ण बॉडी ग्लास आणि एअरोस्पेस ग्रेड अॅल्युमिनिअमपासून बनली आहे. तसंच फोनमध्ये वायरलेस चार्जिंगचाही ऑप्शन देण्यात आला आहे. फास्ट चार्जिंगसह केवळ अर्ध्या तासात हा फोन ५० टक्क्यांपर्यंत चार्ज होतो असा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे. परंतु यासाठी नवा १८ वॉटचा चार्जर खरेदी करावा लागणार आहे.

फोटो सौजन्य – आयफोन इंडिया

कसा आहे कॅमेरा?
नव्या आयफोनमध्ये सिंगल रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. F/1.8 सह १२ मेगापिक्सेलचा हा कॅमेरा असेल. तसंच या कॅमेऱ्याद्वारे ४ के व्हिडीओही शूट करता येणार आहे. तर सेल्फीसाठी यामध्ये ७ मेगापिक्सेलचा फ्रन्ट कॅमेरा देण्यात आला आहे. कॅमेऱ्यासोबतच यात एचडीआर आणि पोर्टेटसारखेही फिचर्स देण्यात आले आहे.