हिंदुजा ग्रुपमधील महत्त्वाची कंपनी व भारतातील व्यावसायिक वापराच्या वाहनांच्या सर्वात मोठ्या उत्पादक कंपन्यांपैकी एक अशोक लेलँडने अतिशय यशस्वी ठरलेल्या आयसीव्ही अर्थात इंटरमिडिएट कमर्शिअल व्हेहिकल श्रेणीत ‘गुरु १०१०’ व मिडीयम ड्युटी वेहिकल्स एमडीव्ही श्रेणीत ‘बॉस’चे – बॉस १६१६ व बॉस १९१६ हे नवे ट्रक भारतीय बाजारात लाँच केले आहेत. गुरु १०१० मध्ये अशाप्रकारच्या गाड्यांमधील सर्वात जास्त इंधन बचत क्षमता व सर्वात जास्त पेलोड असून ही गाडी तिच्या मालकांना प्रति किलोमीटर सर्वात जास्त फायदा मिळवून देऊ शकते असा कंपनीचा दावा आहे. बॉस १६१६ व बॉस १९१६ या गाड्या म्हणजे अभियांत्रिकी, रचना, उपयुक्तता यांचा उत्कृष्ट मिलाप असून पेलोड व कामगिरी या दोन्हींचे उत्तम संतुलन या एमडीव्हीमध्ये आहे.

ट्रकिंगमध्ये आम्ही बनवत असलेल्या वाहनांची संख्या अतिशय वेगाने वाढत आहे. ग्राहकांना अधिकाधिक पर्याय व त्यांच्या गरजांनुसार वाहने हवी असतात, त्यानुसार आम्ही आमच्या गाड्या तयार करतो. ग्राहकांनी दिलेले प्रतिसाद व बाजारपेठेतील गरजा लक्षात घेऊन नवीन गुरु १०१०, बॉस १६१६ व बॉस १९१६ या गाड्या तयार करण्यात आल्या आहेत, असं अशोक लेलँड लिमिटेडचे ग्लोबल ट्रक्सचे अध्यक्ष अनुज कथुरिया म्हणाले. गुरु व बॉस या ट्रक्सच्या श्रेणी त्यांच्या-त्यांच्या टनेज विभागांमध्ये अतिशय लोकप्रिय आहेत. या यशस्वी प्लॅटफॉर्मवर आम्ही नवीन गाड्या तयार केल्या असून ग्राहकांच्या गरजांनुसार त्यामध्ये अधिक जास्त वैशिष्ट्ये आणली आहेत जी नफा व ड्रायव्हरला आराम मिळवून देतात असंही त्यांनी लाँचिंग कार्यक्रमात सांगितलं.

ठळक वैशिष्ट्ये – गुरु १०१०:

· संपूर्णतः नवीन टर्बो-बूस्ट ईएक्सपी इंजिनमुळे अशाप्रकारच्या गाड्यांमधील सर्वोत्तम इंधन बचत क्षमता

· अशाप्रकारच्या गाड्यांमध्ये सर्वोत्तम पेलोड ७२२० किलो (१७ फीट एचएसडी)

· १४ फीट, १७ फीट, २० फीट व २२ फीट लोडींग क्षमतांमध्ये उपलब्ध

· स्थानिक व दीर्घ अंतरावर वितरण सेवांसाठी अगदी योग्य

· दिवसाच्या वेळीही केबिनमध्ये झोपता येईल अशी नाविन्यपूर्ण सुविधा – ‘गुरु’ची केबिन ड्रायव्हरला सुरक्षा व आराम मिळावा यादृष्टीने खास बनवण्यात आली आहे.

· ४ वर्षे किंवा ४ लाख किमी प्रवासापर्यंतची वॉरंटी

· ऑटो पार्टस, ई-कॉमर्स, पोल्ट्री, ग्राहकोपयोगी वस्तू, मोठी इलेक्ट्रिकल उपकरणे, पार्सल, कपडे, शेतीमाल, नाशवंत खाद्यपदार्थ, पेये यांच्या वाहतुकीसाठी वापरण्यासाठी योग्य

ठळक वैशिष्ट्ये – बॉस १६१६ व बॉस १९१६:

· बॉस १६१६ ची क्षमता – १६.२ टीजीव्हीडब्ल्यू व बॉस १९१६ ची क्षमता १८.५ टीजीव्हीडब्ल्यू

· एच-सिरीज ६ सिलिंडर इंजिन आय-ईजीआर या श्रेणीतील सर्वोत्तम मायलेज व पिकअप देते.

· १८ फीट, २० फीट, २४ फीट व ३०.५ फीट लोडींग क्षमतांमध्ये उपलब्ध

· पेलोड व कामगिरीत उत्तम संतुलन साधणारी अत्याधुनिक एमडीव्ही उत्पादने

· आधुनिक स्टाईल, सुबक डिझाईन, अतिशय विश्वसनीय व दमदार कामगिरी

· ड्रायव्हरला सर्वात जास्त सुरक्षा देण्याबरोबरीनेच उत्तम सुविधा व आराम मिळवून देणारी नवीन स्लीपर केबिन

· जास्त पेलोडसाठी ११,३३० किलो (बॉस १६१६ – १८ फीट सीबीसी) आणि सुधारित ऍक्सल लोड रेगुलेशन्ससाठी १३८५० किलो (बॉस १९१६ – १८ फीट सीबीसी) विशेष रचना. पार्सल सेवा, कार कॅरियर, ग्राहकोपयोगी वस्तू, फळे, भाज्या व ई-कॉमर्स साठी योग्य